सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ

Date:

  • शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या वीरपत्नी मुलीची घेतली भेट
  • पीएम मोदींची पोलिस प्रमुखांच्या राष्ट्रीय परिषदेला देखील उपस्थिती

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पुण्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांच्या हस्ते राजभवन येथे राज्य सैनिक कल्याण विभागाच्या वतीने आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी पीएम मोदींनी शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या वीरपत्नी उमा आणि मुलगी उमंग यांच्याशी संवाद साधला.

यावेळी लेफ्टनंट कर्नल आर.आर. जाधव, श्रीमती उमा कुणाल गोसावी, उमंग कुणाल गोसावी, नाईक नंदकुमार रंगराल चावरे, सुभेदार संजय कुमार मोहिते, एनसीसी विद्यार्थी एसयूओ अमंग रुपेली, जेयूओ संकेत कदम, जेयूओ विजयश्री सुरदे, एसजीटी प्रिती जगदाळे, एनसीसी अधिकारी बाळासाहेब शिंदे इत्यादी लोक उपस्थित होते. या प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या पत्नी उमा आणि मुलगी उमंग यांच्याशी संवाद साधला तसेच सर्वांसोबत छायाचित्रे सुद्धा घेतली.

मोदींनी घेतली पोलिस प्रमुखांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ केल्यानंतर शनिवारीच राज्यातील पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांच्या राष्ट्रीय परिषदेला उपस्थिती नोंदवली. पुण्यात शुक्रवारी सुरू झालेली ही काँफ्रन्स रविवारपर्यंत चालणार आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनीही उपस्थिती लावली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

येरवडा कारागृहात 5 मोबाईल,2 पॉवर बँक,चार्जिंग वायर सापडली..

पुणे- येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न...

माझी गाणी आजही रसिकांच्या पसंतीत -सिनेगीतकार समीर अंजान

'एमआयटी एडीटी' विद्यापीठाच्या 'पर्सोना महोत्सवा'ची उत्साहात सांगता लोणी-काळभोर (पुणे)...

अंतरकचेरी व्हॉलीबॉल स्पर्धेत सलग दहा वर्षे विजेतेपदाची परंपरा कायम!

पिंपरी चिंचवड महापालिकेचा दणदणीत विजयपिंपरी : पुणे आंतर कचेरी...