बाल कामगार प्रथा विरूद्ध जनजागृती मोहिम

Date:

पुणे  : दिनांक 07 नोव्हेंबर 2019 ते 07 डिसेंबर 2019 या कालावधीमध्ये बाल कामगार प्रथा विरूद्ध जनजागृती करण्याचे दृष्टीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 28 नोव्हेंबर 2019 रोजी बाल कामगाराशी निगडीत काम करणा-या स्वंयसेवी संस्था, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या सहकार्याने अत्यल्प उत्पन्न असलेल्या पालकांचे प्रबोधन करण्याकरीता तसेच बालकामगार प्रथा विरोधी जनजागृती करण्याकरीता पुणे कामगार उप आयुक्त, विकास पनवेलकर यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हयातील – भोर, इंदापूर, हवेली, दौंड, बारामती या तालुक्यांच्या ठिकाणी पथकांची नेमणूक करण्यात आली होती.


या पथकाव्दारे नेमून देण्यात आलेल्या तालुक्यामध्ये आशा सेविका व अंगणवाडी सेविका- श्रीमती कविता अलगुडे, भोर तालुका, श्रीमती अनिशा सय्यद् व श्रीमती रुपाली पांढरे, इंदापूर तालुका, श्रीमती लक्ष्मी क-हे, बारामती तालुका यांनी कामगार उप आयुक्त कार्यालयातील सुविधाकार यांचे समवेत अत्यल्प उत्पन्न असलेल्या पालकांच्या बैठका घेवून बाल कामगार प्रथेविरुध्द् जनजागृती मोहिम राबविली व बाल कामगार या अनिष्ट् प्रथेचे उच्चाटन करणेबाबत माहिती देवून प्रबोधन करण्यात आले.
उपस्थित सर्व पालकांनी आपल्या बालकांना कामावर न पाठविता त्यांना शाळेत पाठविणेबाबत आवाहन कामगार उप आयुक्त कार्यालयाच्यावतीने करण्यात आले. तसेच बालकामगार प्रथा विरोधी जनजागृती करण्याकरीता तालुक्याच्या ठिकाणी रॅली आयोजित करण्यात आली होती व प्रमुख बाजारपेठामध्ये बालकामगार कामावर न ठेवण्याबाबतचे स्टीकर लावण्यात येवून बाल कामगार न ठेवणेबाबतची जागृती करण्यात आली. तसेच विविध आस्थापना मालकांकडून बालकामगार कामावर न ठेवणेबाबतची हमीपत्रे भरुन घेण्यात आली. जनजागृती मोहिमेचा एक भाग म्हणून बालकामगार कामावर न ठेवणेबाबतचे आवाहन करणारे फिरते वाहनाव्दारे तालुक्याच्या ठिकाणी प्रबोधन करण्यात आले. दि.29 व 30 नोव्हेंबर 2019 रोजी पुणे शहारातील अमनोरा मॉल- हडपसर, फिनिक्स मार्केट सिटी – नगर रोड, रिलायन्स रिटेल- औंध, वेस्टएनड मॉल- औंध या मॉलमध्ये सेल्फी कटआऊट् लावण्यात आले असून तेथे येणा-या ग्राहकांना बाल कामगार या अनिष्ट् प्रथेविरुध्द् माहिती देण्यात येवून बाल कामगार कामावर न ठेवणेबाबत आवाहन करण्यात येत आहे. तसेच कामगार उप आयुक्त यांचे कार्यालयात देखील सेल्फी कटआऊट् लावण्यात आले असून, तेथे येणा-या अभ्यागतांना बाल कामगार या अनिष्ट प्रथेविरुध्द माहिती देण्यात येवून बाल कामगार कामावर न ठेवणेबाबतचेही आवाहन कामगार उप आयुक्त श्री. पनवेलकर यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबई प्रमाणे पुण्यातही 500 चौ. फू . घराला मिळकत कर शून्य करा- स्थायी च्या पहिल्या बैठकीत कॉँग्रेस चा प्रस्ताव

ऐतिहासिक निर्णयाबाबतचा चेंडू आता अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंच्या मैदानात...

सोलर एनर्जी प्रकल्प वापरणाऱ्यांना मिळकत करात 10 टक्के सवलत द्या – दुधाने आणि मानकर यांचा प्रस्ताव

पुणे-सोलर एनर्जी प्रकल्प, म्हणजेच सूर्यप्रकाशाद्वारे वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प...

प्रदूषणाने कॅन्सर; महाराष्ट्र सरकारची कबुली, 57% रुग्णांचे फुफ्फुस ‘आजारी’, राज्य सरकारच्या अभ्यासात मोठा खुलासा

बांधकामांच्या ठिकाणचे धुळीचे लोट रोखण्यासाठी मोहीम ही देवेंद्र फडणविसांची...