कृषी विज्ञान केंद्रामध्ये गो-कृषी विज्ञान केंद्र स्थापन करणार – डॉ. वल्लभभाई कथिरिया

Date:

पुणे : देशातील कृषी विज्ञान केंद्रामध्ये केंद्र शासनाच्या पुढाकारातून गो-कृषी विज्ञान केंद्र स्थापन करण्यात येणार असून गोशाळांना स्वावलंबी बनविण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज असल्याचे मत राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथिरिया यांनी आज व्यक्त केले.

           जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीची बैठक आज राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथिरिया यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, पशुसंवर्धन आयुक्त लक्ष्मीनारायण मिश्रा, उपायुक्त डॉ. बाकरेवान, डॉ. शिवाजी विधाते, डॉ. अनिल देशपांडे,अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक पाटील, सहायक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी, समितीचे सदस्य सुरेश रास्ते, संदीप नवले, नेहा पंचामिया आदी उपस्थित होते.

            भारतीय संस्कृतीत गाईला पवित्र मानले जाते. गाईचे दूध, गोमूत्र यामध्ये औषधी गुणधर्म असतात. याशिवाय गाईच्या शेणाचा खत म्हणून वापर केला जातो. गाईच्या या सर्व गुणधर्मामुळे तिचे संगोपन व्यवस्थित व्हावे यासाठी गोशाळांना स्वावलंबी करण्यावर आपण भर देणे आवश्यक असल्याचे सांगतानाच आदर्श गो शाळांना पर्यंटन केंद्र बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. कथिरिया यांनी सांगितले.

    कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून गोसंवर्धनासंदर्भात प्रशिक्षण व बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगून प्रत्येक शेतक-यांकडे एक तरी गाय असावी, तसेच यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा डॉ. कथिरिया यांनी यावेळी व्यक्त केली.

   डॉ. कथिरिया यांनी जिल्हा प्राणी क्लेष समितीचे सदस्य व पशुसंवर्धन विभागाच्या अधिका-यांकडून गोसंवर्धनासंदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यातील विद्यार्थिनीच्या आत्महत्याप्रकरणाची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीरपणे दखल

कुटुंबाशी फोनवर संवाद साधत दिला धीर पुणे.दि.१३: पुण्यातील बोटॅनिकल सर्व्हे...

इराण भारतीय जहाजांना होर्मुझ पार करण्यास मदत करणार:अमेरिकेला म्हटले- होर्मुझवर हल्ला केला तर आखातातील कोणतेही बंदर सुरक्षित राहणार नाही

इराणवर अमेरिकेच्या नौदलाची नाकेबंदी सुरू-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात साडेतीन हजाराहून अधिक लाभार्थ्यांना मिळाला लाभ

पुणे, दि.१३: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत लोणीकंद...