मदतीसह जीवनावश्यक साहित्यांची वाहतुक करणाऱ्या वाहनांसाठी महामार्गावर स्वतंत्र ग्रीन कॉरिडॉर

Date:

Ø  पुणे विभागातील 585 गावातील 85 हजार 119 कुटुंब बाधीत

Ø  पुणे विभागातील 4 लाख 13 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले

Ø  सांगली सोलापूर जिल्ह्यातील 30 हजार 515 जनावरांना सुरक्षित स्थळी हलविले

Ø  सांगलीला 80 कोल्हापूरला 150  सातारा 72 अशी एक 302 वैद्यकीय पथके कार्यरत

Ø  अलमट्टीतून लाख 30 हजार क्युसेकचा विसर्ग

Ø  एसटीची सेवा पूर्ववत करण्यासाठी विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती

Ø  विभागातील 203 रस्ते व 94 पुलांवरील वाहतूक बंद

Ø  पुणे बंगळूरु राष्ट्रीय महामार्ग अजूनही बंद

 

पुणे दि. 10: पुणे विभागात पावसाचा जोर कमी झाला असून कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून 5 लाख 30 हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत असल्याने विभागातील पूरस्थिती नियंत्रणात येत आहे. विभागातील 4लाख 13 हजार 945 लोकांचे सुरक्षित स्थळी स्थानांतर करून त्यांची  535 शिबीरांमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. पूरस्थिती ओसरल्यानंतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता बाधीत कुटुंबांना ‘युआयडी’च्या आधारावर ओळख ग्राह्य धरून शासनाकडून आलेले सानुग्रह अनुदान तातडीने देण्याच्या सूचना बँकांना केल्या आहेत. तसेच जीवनावश्यक वस्तूंसह मदत व बचावाच्या वाहनांना पुण्यापासून कोल्हापूर व सांगलीपर्यंत महामार्गावर स्वतंत्र ‘ग्रीन कॉरिडॉर’ची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिली.

पुणे विभागातील पूरस्थितीसह बचाव व मदत कार्याची माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. म्हैसेकर बोलत होते.

डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात पावसाचा जोर ओसरला हवामान विभागाच्यावतीने पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला नाही. कोयना धरणासह इतर धरणातील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. तसेच कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणातून 5लाख 30 हजार क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मात्र कर्नाटकमधील घटप्रभा नदीच्या क्षेत्रात पाऊस पडल्याने या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून कृष्णेसह इतर नद्यांच्या पाण्यामुळे अलमट्टी धरणात 6 लाख क्युसेक इतकी पाण्याची आवक होत आहे. पावसाची स्थिती सामान्य राहिल्यास येत्या 72 तासात पाणी ओसरायला सुरुवात होणार आहे.

 मदत व पुनर्वसनासाठी प्रशासन सज्ज

विभागातील पूरस्थिती निवळल्यानंतर स्वच्छता व आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. शहरी भागांसह ग्रामीण भागाची स्वच्छता करण्यासाठी विशेष मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे. तसेच शहरातील अनेक शौचालये पुरामुळे बाधीत झाल्यामुळे फिरती शौचालये पुरविण्यात येणार आहेत. मदत व पुनर्वसनाच्या कामांना गती देण्यासाठी शासनाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी 15 तर सांगली जिल्ह्यासाठी 13 विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.

पूरस्थितीनंतर येणाऱ्या रोगराईवर व इतर आरोग्याच्या समस्येवर मात करण्यासाठी पूरबाधित गावात विशेष आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहेत. पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक अजूनही बंद असून ही वाहतूक सुरु झाल्यानंतर पहिल्यांदा जीवनावश्यक साहित्याच्या वाहनांसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर पुरामुळे पाण्यात असलेल्या पुलांची व रस्त्यांची पाहणी करूनच सर्वसामान्य वाहनांना प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे.

पुणे विभागातील पूर स्थिती (दिनांक 10.8.2019रोजी दुपारी  3.50 वाजेपर्यंत)

 पाऊस

जिल्हा प्रत्यक्ष झालेला पाऊस पावसाची टक्केवारी अतिवृष्टी/पूर परिस्थिती असलेले तालुके
सांगली 526.72 224 निरंक
कोल्हापूर 1553.95 128 3(राधानगरी,ग.बावडा    व चंदगड)
सातारा 993.76 183.71 2(जावळी व महाबळेश्वर )

 धरणातील पाणीसाठा/पाणीपातळी  विसर्ग

धरण साठाक्षमता पाणीपातळी आवक जावक/विसर्ग
कोयना 102.75 2161’07 44357 44853
अलमट्टी   517.30 m 600833 530000

पाणी पातळी (फुट  इंचामध्ये)

स्थळ धोका पातळी कालची पाणीपातळी आजची पाणीपातळी वाढ/घट
कराड पूल        
आयर्विन पूल 45’ 57’3” 55’10” 1’5” घट
अंकलि पूल 50’3 62’4” 61’7” 0’7” घट
राजाराम बंधारा 43’ 52’5” 51’8” 0’9” घट
राजापूर बंधारा 58’ 62’4” 62’8” 0’4” वाढ

स्थानांतरित कुटंबे

अ.क्र. जिल्हा बाधिततालुके बाधित गावे स्थानांतरीतकुटूंबांची संख्या स्थानांतरीतव्यक्तींची संख्या स्थानांतरीत व्यक्तींनाराहण्यासाठी तात्पुरतानिवारा केंद्र संख्या
1 सांगली 4 108 28,537 1,43,641 117
2 कोल्हापूर 8 249 48,588 2,33,150 187
3 सातारा 8 128 2180 10031 128
4 पुणे 1 1 31 161 1
5 सोलापूर 6 99 5783 26962 102
एकूण 27 585 85,119 4,13,945 535

पुराने वेढल्यामुळे संपर्कहीन गावे

अ.क्र जिल्हा बाधिततालुक्यांचीसंख्या संपूर्ण संपर्क तुटलेल्या गावांचीसंख्या संपूर्ण संपर्कतुटलेल्या व्यक्तींचीसंख्या तातडीने सुरक्षित ठिकाणीहलविलेल्या लोकांची संख्या
1 सांगली 3 28(मिरज-6,वाळवा-2,पलूस-20)    
2 कोल्हापूर 4 18(शिरोळ-9,ग.बावडा-1,करवीर-3,हातकणंगले-5) 58,690 47,401
3 सातारा 0 0 0 0
4 सोलापूर 2 16 8147 8147
5 एकुण 8 47    

पुरामुळे मयत व्यक्ती

अ.क्र. जिल्हा पुरामुळे मयत व्यक्तींचीसंख्या पुरामुळे बेपत्ता व्यक्तींचीसंख्या
1 सांगली 12 8
2 कोल्हापूर 4 1
3 सातारा 7 1
4 पुणे 6 0
5 सोलापूर 1 0
एकूण 30 10

सांगली जिल्ह्यामध्ये ब्रम्हनाळ (ता.पलूस) येथून खटावच्या दिशेने जाणाऱ्या बोट दुर्घटनेत 9 महिला, 1 पुरूष व 2 लहान बालके असे एकुण 12 व्यक्ती मृत पावले आहेत. अजूनही 6व्यक्ती बेपत्ता आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2 व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून जाऊन 1 व्यक्ती अंगावर झाड पडून व 1 व्यक्ती अंगावर भिंत पडून मयत झाली आहेत.

अतिवृष्टीमुळे पशुधनाचे नुकसान

अ.क्र जिल्हयाचेनाव वर्गनिहाय पशुधनाचा तपशील (संख्या) नुकसानीचीअंदाजित रक्क्म(रुपये)
    गायवर्ग महिषवर्ग (लहानपशुधन)

(वासरे गाय)

शेळी मेंढी कोंबडया इतर  
1 सांगली 9 5 3 6 0 2700 0 12,12,000
2 कोल्हापूर 10 14 0 29 0 5800 0 0
3 सातारा 1 4 3 3 0 2100 0 5,83,000
4 पुणे 0 0 0 0 0 0 0 0
5 सोलापूर 0 0 0 0 0 0 0 0
एकुण पुणे विभाग 20 23 6 38 0 10,600 0 17,95,000

मदत  बचावकार्य

एनडीआरएफ/ एसडीआरएफ/टेरिटोरल आर्मी/ नेव्ही/ एनजीओ  जिल्हा प्रशासनकडील पथके

जिल्हा पथके बोटी जवान
सांगली 37 95 569
कोल्हापूर 48 74 456

 अन्नधान्य वितरण

शासनाने अतिवृष्टी पुरामुळे बाधीत कुटूंबानाअन्नधान्य वितरीत करण्यासाठी काढलेल्या शासन निर्णयानूसार प्रतिकुटूंब 10 किलो गहू व 10 किलो तांदुळ मोफत पुरविण्यात येणार असून त्याचे नियोजनही करण्यात आले आहे. सद्यस्थितीतमदत कॅम्पमधील स्थलांतरीत व्यक्तींना शिजवलेले अन्नपाणी व इतर जीवनावश्यक साहित्यही पोहोचविण्यात येत आहे.

वाटप करण्यात आलेले मदत साहित्य

.क्र साहित्य एकुण
1 बिस्किट पाकिटे 61,740
2 पिण्याचे पाणी बॉटल 43,800
3 दुध पावडर पाकिटे 2500
4 औषधे 3000 कॅप्सूल
5 मेणबत्त्या 3600
6 फुडपाकिटे 21,600
7 सोलर लाईट 1500

1.भारतीय जनसंविधान मंच कोल्हापूर कॉलींग या संस्थेमार्फत 4000 बिस्किट पाकिटांचा कोल्हापूरमध्ये पुरवठा केला असून कोल्हापूर शहरामधील कॅम्पमध्ये या संस्थेमार्फत 2 वेळचेजेवण दिले जात आहे.

2.कोल्हापूर जिल्हयामध्ये गोकुळ डेअरी मार्फत 24 तास मोफत दुध पुरवठा करण्यात येत आहे. येथे कोणीही येवून दुध घेऊन जाऊ शकतात.

3.सांगली व कोल्हापूर जिल्हयातील सर्व हॉस्पीटल हे रुग्णांना मोफत सेवा पुरवित आहे.

  1. महावितरण

प्रादेशिक कार्यालय, महावितरण, पुणे अंतर्गत पुरग्रस्त भागात जिल्हानिहाय विदयुत पुरवठा खंडीत माहिती

अ.क्र जिल्हयाचे नाव उपकेंद्र संख्या वाहिनी संख्या रोहित्र संख्या ग्राहक संख्या
1 पुणे 0 0 1378 12,276
2 कोल्हापूर 17 152 3570 1,17,644
3 सांगली 14 167 2607 1,33,700
4 सातारा 1 2 821 10,397
5 सोलापूर 0 1 1956 22,613
  पुणे विभाग एकुण 32 322 10,332 2,96,630

कोल्हापूर जिल्हयातील 9 उपकेंद्र, 453-रोहित्रे व 56 हजार 326 ग्राहकांची वीज सेवा सुरू केली आहेत. तसेच सांगली जिल्ह्यातील 1-उपकेंद्र , 217-रोहित्र व 10 हजार 404 ग्राहकांची सेवासुरू केले आहेत. पाणी कमी होताच कोल्हापूर व सांगली जिल्हायातील वीज पुरवठा पूर्ववत करण्यसाठी लागणारे साहित्य जसे की, पोल,रोहित्र,मीटर,इ. तयार ठेवण्यात आले आहेत.

कोल्हापूरसाठी हेल्पलाईन क्रमांक 7875769103 व सांगली जिल्हयासाठी 7875769449 कळविण्यात आला आहे. स्थानांतरित केलेल्या मदत कॅम्पमध्ये वीजपुरवठा देण्यासाठी विद्युतजनरेटरची सोय करण्यात आली आहे.

विभागातील बंद पुल व रस्ते

अ.क्र. जिल्हा बंद रस्त्यांची संख्या पुराच्या पाण्यामुळे बंदअसलेल्या पुलांची संख्या दरड कोसळल्यामुळे बंदअसलेल्या रस्त्यांचीसंख्या
1 सांगली 66 33 0
2 कोल्हापूर 91 39 2
3 सातारा 5 5 0
4 पुणे 8 3 2
5 सोलापूर 33 14 0
  एकुण 203 94 4

सांगली :- सांगली जिल्हयामध्ये प्रमुख राज्यमार्ग 29 प्रमुख जिल्हामार्ग 37असे एकुण 66 रस्ते बंद आहेत.

कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्हयामध्ये 30 राज्यमार्ग व 61प्रमुख जिल्हामार्ग असे एकुण 91रस्ते बंद आहेत.

अतिवृष्टीमुळे राज्यपरिवहन महामंडळाच्या द्द करण्यात आलेल्या फेया (मार्गांची संख्या)

अ.क्र जिल्हा फे-याची संख्या) (मार्गाची संख्या)
1 सांगली 8060 43
2 कोल्हापूर 29517 31

पुणे विभाग– जिल्हा नियंत्रण कक्ष  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
.क्र जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नाव भ्रमणध्वनी क्रमांक
1 सांगली 0233-2600500 श्री रफिक नदाफ 9096707339
2 कोल्हापूर 0231-2652953/2652950 श्री संकपाळ 9823324032
3 सातारा 02162-232175/232349 श्री देविदास ताम्हाणे 9657521122
4 पुणे 020-26123371 श्री विठठल बनोटे 8975232955
5 सोलापूर 0217-2731012 श्री बडे 9665304124
6 विभागीय नियंत्रणकक्ष पुणे 020-26360534 श्री एस एस भोंग 9730701205

पूर परिस्थिती मधील मयत/बेपत्ता व्यक्तींची माहिती

जिल्हासांगली –मयत व्यक्तीची माहिती

.क्र. व्यक्तीचे नाव राहण्याचे ठिकाण लिंग वय शेरा
1 गंगुबाई भिमा सलगर ब्रम्हनाळ ता.पलूस स्त्री 60  

 

 

 

बोट दुर्घटना एकूणमयत संख्या -12

स्त्री -11

(2 लहान मुली)

पु.-01

2 बाबूराव आण्णा पाटील ब्रम्हनाळ ता.पलूस पु 65
3 वर्षा भाऊसो पाटील ब्रम्हनाळ ता.पलूस स्त्री 40
4 लक्ष्मी जयपाल वडेर ब्रम्हनाळ ता.पलूस स्त्री 65
5 कस्तूरी बाबासाहेब वडेर ब्रम्हनाळ ता.पलूस स्त्री 35
6 राजमती जयपाल चौगुले ब्रम्हनाळ ता.पलूस स्त्री 62
7 कल्पना रविंद्र कारंडे ब्रम्हनाळ ता.पलूस स्त्री 35
8 सुवर्णा उर्फ नंदा तानाजीगडदे ब्रम्हनाळ ता.पलूस स्त्री 35
9 राजवीर आप्पासो घटनट्टी ब्रम्हनाळ ता.पलूस पु. 4 महिने
10 सोनाली आप्पासोघटनट्टी (अश्विनी नरुटेयांचे बाळ) ब्रम्हनाळ ता.पलूस स्त्री 4
11 सुरेखा मधुकर नरुटे ब्रम्हनाळ ता.पलूस स्त्री 45
12 रेखा शंकर वावरे ब्रम्हनाळ ता.पलूस स्त्री 40

 

जिल्हासांगली –बेपत्ता व्यक्तीची माहिती

अ.क्र. व्यक्तीचे नाव राहण्याचे ठिकाण लिंग वय शेरा
1 सौरव तानाजी गडदे ब्रम्हनाळ ता.पलूस पु. 8  

बोट दुर्घटना एकूणबेपत्ता संख्या

पु- 03 (एक लहानमुलगा)

स्त्री-03 (एक लहानमुलगी)

2 सुनिल शंकर रोगे ब्रम्हनाळ ता.पलूस पु. 33
3 आमसिध्द महादेव नरुटे ब्रम्हनाळ ता.पलूस पु. 16
4 कोमल मधुकर नरुटे ब्रम्हनाळ ता.पलूस स्त्री 21
5 मनिषा दीपक पाटील ब्रम्हनाळ ता.पलूस स्त्री 31
6 क्षिती दिपक पाटील ब्रम्हनाळ ता.पलूस स्त्री 4
7 सचिन दत्तात्रय पोळ कडेगांव पु. 35 पुराच्या पाण्यात वाहूनगेले आहेत.
8 दत्तात्रय तुकाराम सावंत मिरज पु. 55

जिल्हाकोल्हापूर

मयत व्यक्तीची माहिती

अ.क्र. व्यक्तीचे नाव राहण्याचे ठिकाण लिंग वय शेरा
1 केशव बाळु पाटील इटे ता.आजरा पुरुष 55 ओढयाच्या पाण्यात वाहून
2 गंगुबाई शामराव सोरटे केर्ले ता.करवीर स्त्री 80 अंगावर भिंत पडून
3 जिजाबाई एकनाथ खोत देळेपैकी संकपाळवाडीता.भुदरगड स्त्री 50 पुराच्या पाण्यात वाहून
4 जिजाबाई बडकु कडुकट हलकर्णी ता.चंदगड स्त्री 55 झाड अंगावर पडून

 

बेपत्ता व्यक्तीची माहिती

.क्र. व्यक्तीचे नाव राहण्याचे ठिकाण लिंग वय शेरा
1 आवाक्का शंकर भोसले ता.गडहिंग्लज स्त्री   पुराच्या पाण्यात वाहूनगेल्याने

जिल्हासातारा

एकुण  मयत 7 त्यापैकी नावे प्राप्त झालेल्या व्यक्तीची माहिती

.क्र. व्यक्तीचे नाव राहण्याचे ठिकाण लिंग वय शेरा
1 धिरज शिंगटे रा.मर्ढे पुरुष    
2 लता चव्हाण कामथी तर्फ परळी स्त्री    
3 सागर आत्मारात बल्लाळ वेंढवाडी पुरुष    

 

जिल्हासातारा 

बेपत्ता झालेल्या व्यक्तीची माहिती

अ.क्र. व्यक्तीचे नाव राहण्याचे ठिकाण लिंग वय शेरा
1 सतीश सोमा कचरे मौजे नायगाव,ता.खंडाळा पु. 43 दुचाकी वाहनासोबत नायगाव तेकेसुर्डी  दरम्यान पुलावरुनवाहत्या पाण्यासोबत वाहूनगेल्याने

जिल्हापुणे

 मयत व्यक्तीची माहिती

अ.क्र. व्यक्तीचे नाव राहण्याचे ठिकाण लिंग वय शेरा
1 कुणाल अजय दोडके मावळ पु   घरावरचे छत पडून
2 श्रीराम दर्ज सोहू मावळ पु   धबधब्याखाली मृत्यू
3 जयप्रकाश नायडू मावळ पु   घरावरचे छत पडून
4 नजमा सलिम शेख जुन्नर स्त्री   ढिगा-याखाली मृत्यू
5 कौशल्या चंद्रकांत खान पुरंदर स्त्री   नदीपात्रात पाय घसरून
6 कबाल बाबु खान दौंड पु   पुरात वाहून गेलेने

 

 

 

जिल्हासोलापूर

मयत व्यक्तीची माहिती

अ.क्र. व्यक्तीचे नाव राहण्याचा  पत्ता लिंग वय सदयस्थिती
1 संतोष विष्णू पाटोळे मौजे वाघोली ता.माळशिरस पु 42 मयत
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...