जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्ताने जिल्हा रुग्णालयात सोहळा

Date:

पुणे –  जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्ताने येथील  जिल्हा रुग्णालयात  जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमास उद्घाटक म्हणून आमदार लक्ष्मण जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्‍यानंतर  पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस वंदन करण्‍यात आले.

जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी  प्रास्‍ताविक केले. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने आरोग्यास होणाऱ्या दुष्परिणामांची त्‍यांनी  माहिती दिली.  मौखिक आरोग्य चांगले ठेवून स्वस्थ जीवन कसे जगता येईल,  याबाबत त्‍यांनी मार्गदर्शन केले.  जिल्हयात एकूण १४ समुपदेशन केंद्र सुरु असून या  समुपदेशन केंद्राकरीता तयार करण्यात आलेल्या  समुदेशन पुस्तकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हा रुग्णालयातील वाहक श्री लोहार यांनी तंबाखू सोडली असल्याने त्यांचे सुद्धा स्वागत शाल व श्रीफळ देऊन करण्यात आले. लोहार यांनी कश्याप्रकारे तंबाखू सोडली व याकरीता दृढ निश्चय कसा आवश्यक आहे, हे मनोगतात सांगितले.  त्यानंतरआमदार जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त करत सर्वांनी तंबाखू सोडावी,  ते कठीण नाही.  मी सुद्धा सोडली, असे म्हणत सर्वांना तंबाखू सोडण्याकरीता आवाहन केले. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी  तंबाखू सोडणे गरजेचे आहे. धूम्रपानामुळे  सर्वांनाच  त्रास होतो,  त्यामुळे असे करणाऱ्यास दंड करावा व तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तीस त्याची जाणीव व्हावी याकरीता त्यांना समुपदेशन करावे, असे त्यांनी सांगितले. आमदार जगताप यांनी उपस्थितांना  तंबाखू मुक्तीची शपथ दिली. कार्यक्रमानंतर शाहीर बाळासाहेब मालुसकर यांनी एकपात्री नाटक सादर केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबई महापालिकेचे बजेट 80,952 कोटींचे,पण तब्बल 36 हजार कोटींच्या ठेवी वापरणार….

मुंबईकरांसाठी या अर्थसंकल्पात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे....

बदलत्या काळानुसार पत्रकारांनी तंत्रस्नेही होणे गरजेचे – प्रा. सुशोभन पाटणकर

ए आय तंत्रज्ञानाद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी शहानिशा आवश्यक पिंपरी,...

मुंबई प्रमाणे पुण्यातही 500 चौ. फूट घराला मिळकत कर शून्य करा- स्थायी च्या पहिल्या बैठकीत कॉँग्रेस चा प्रस्ताव

ऐतिहासिक निर्णयाबाबतचा चेंडू आता अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंच्या मैदानात.. प्रशासनाचा...

सोलर एनर्जी प्रकल्प वापरणाऱ्यांना मिळकत करात 10 टक्के सवलत द्या – दुधाने आणि मानकर यांचा प्रस्ताव

पुणे-सोलर एनर्जी प्रकल्प, म्हणजेच सूर्यप्रकाशाद्वारे वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प...