31 मे पासून तंबाखू नकार सप्‍ताह – अपर जिल्‍हाधिकारी रमेश काळे

Date:

पुणे, दिनांक 28- तंबाखूमुक्‍तीबाबत शहरी भागातील नागरिकांप्रमाणेच ग्रामीण भागातही जनजागृती करण्‍यात यावी, असे आवाहन अपर जिल्‍हाधिकारी रमेश काळे यांनी केले. राष्‍ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्‍या जिल्‍हा स्‍तरीय समन्‍वय समितीच्‍या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्‍त जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. अशोक कांबळे, अतिरिक्‍त जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. अभय तिडके यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

31 मे पासून तंबाखू नकार सप्‍ताह सुरु करण्‍यात येत आहे. या निमित्‍ताने शासकीय कार्यालयातील कर्मचारी-अधिका-यांची मौखिक आरोग्‍य तपासणी करण्‍यात येणार आहे. कार्यालय प्रमुखांनी या कामी पुढाकार घेवून सहकार्य करण्‍याचे आवाहन श्री. काळे यांनी केले. पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही तंबाखू नकार सप्‍ताहामध्‍ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन जनजागृती करावी, शहरातील जाहिरात फलकांवर, शासकीय कार्यालयांमध्‍ये तंबाखूचे दुष्‍परिणाम दर्शवणारे फलक लावण्‍यात यावेत, निवासी सोसायट्या तंबाखूमुकत घोषित करण्‍याबाबत पुढाकार घ्‍यावा,असेही आवाहन त्‍यांनी केले.

कार्यक्रमाचे समन्‍वय डॉ. राहूल मणियार यांनी राष्‍ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची माहिती सांगितली. गेल्‍या वर्षी या कार्यक्रमांतर्गत एकूण 88 प्रशिक्षण घेण्‍यात आले त्‍यामध्‍ये 7299 प्रशिक्षणार्थींना तंबाखूच्‍या दुष्‍परिणामांबाबत माहिती देण्‍यात आली. या कालावधीत 1504 लोकांवर कार्यवाही करण्‍यात येऊन 3 लाख 44 हजार 165 रुपये एवढी रक्‍कम दंड स्‍वरुपात जमा करण्‍यात आली. या शिवाय अन्‍न व औषध प्रशासनाच्‍यावतीने जिल्‍ह्यात 1 कोटी 24 लाख 96 हजार 148 रुपये किंमतीचा गुटखा तर ग्रामीण पोलीस विभागाच्‍यावतीने 30 लाख 85 हजार 410 रुपये किंमतीचा गुटखा जप्‍त करण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

बैठकीस दिलीप करंजखेले, जीवन माने, अनिता वाघचौरे, बीके भाग्‍यश्री, बीके दशरथभाई, बीके पार्थभाई, मुकूंद अयाचित, दीपक माळी, ज्‍योती ढमाळ, मदन व्‍हावळ, जयश्री डोंगरे, अपर्णा शेंडकर, सचिन पाटील आदींची उपस्थिती होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सोलर एनर्जी प्रकल्प वापरणाऱ्यांना मिळकत करात 10 टक्के सवलत द्या – दुधाने आणि मानकर यांचा प्रस्ताव

पुणे-सोलर एनर्जी प्रकल्प, म्हणजेच सूर्यप्रकाशाद्वारे वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प...

प्रदूषणाने कॅन्सर; महाराष्ट्र सरकारची कबुली, 57% रुग्णांचे फुफ्फुस ‘आजारी’, राज्य सरकारच्या अभ्यासात मोठा खुलासा

बांधकामांच्या ठिकाणचे धुळीचे लोट रोखण्यासाठी मोहीम ही देवेंद्र फडणविसांची...

येरवडा कारागृहात 5 मोबाईल,2 पॉवर बँक,चार्जिंग वायर सापडली..

पुणे- येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न...