पुणे, – क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती दिनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात उपायुक्त श्रीमती कविता द्विवेदी, उपायुक्त दीपक नलवडे, उपायुक्त निलेश सगर यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी तहसीलदार दगडू कुंभार, तहसीलदार श्रीमती देशपांडे, तहसीलदार श्रीमती शिंदे, नायब तहसीलदार (महसूल) यशवंत भरकुंडे तसेच विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

