पुणे,– जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासह केंद्रीय निवडणूक निरीक्षक रजत अग्रवाल, राजेश शर्मा, राजीव श्रीवास्तव,पोलीस ऑब्झर्व्हर आयुष मनी तिवारी, विजयकुमार चढ्ढा, बारामती लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष डुंबरे, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी मिडीया सेंटरला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पहाणी केली. लोकसभा निवडणुकीची माहिती प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मिडीया सेंटर स्थापन करण्यात आले आहे. यावेळी उप जिल्हाधिकारी सुधीर जोशी, उप संचालक (माहिती) मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहायकआयुक्त अण्णासाहेब बोदडे तसेच विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. केंद्रीय निरीक्षकांनी पेड न्यूज तसेच माध्यम प्रमाणीकरणाच्या कामाचीही माहिती घेतली. वृत्तपत्रातील बातम्या, सोशल मिडीयावर तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातील बातम्यांवर योग्य लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची मिडीया सेंटरला भेट
Date:

