फुले दांपत्यास भारतरत्न मिळावा यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध -सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले

Date:

पुणे- ज्यांच्या आदर्शाने महाराष्ट्रात  समाज क्रांती घडली व नवसमाज समाज उभा राहिला त्यातून बलशाली राष्ट्र उभारणीसाठी शिक्षणाचा पाया रोवला , महिला शिक्षणाचे व सक्षमीकरणाचे दार ज्यांच्या मुळे आज खुले झाले आहे असे क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रयत्नातून केंद्र शासनास तसा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे मत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री  राजकुमार बडोले  यांनी व्यक्त केले.

दिनांक 3 जानेवारी 2019 सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने पुण्यात सामाजीक न्याय विभागाच्या वतीने  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्ताने श्री. बडोले आज पुण्यात आले असता त्यांनी सपत्नीक फुले वाड्यात भेट दिली. यावेळी त्यांनी ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. फुले वाड्यात एका सामाजिक संस्था मार्फत आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते त्यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक समाज समाजोपयोगी उपक्रम राज्यभर राबविले जात आहे समाजसुधारकांनी जो आदर्श घालून दिला आहे  त्याच पावलावर पाऊल ठेवून राज्य प्रगती करीत आहेत त्यातून नवनवीन योजना राबविल्या जात असल्याचेही  श्री. बडोले यांनी यावेळी बोलताना सांगितले

श्री. राजकुमार बडोले यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी शारदा बडोले देखील उपस्थित होत्या त्याच प्रमाणे समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण अविनाश देवसटवार, सहायक आयुक्त समाज कल्याण पुणे विजयकुमार गायकवाड, यांच्यासह आदी मान्यवर मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...