पुणे-आगामी वर्षातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या पुर्वतयारीचा भाग म्हणून भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार जनतेमध्ये , मतदारांमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन आणि निवडणूक प्रक्रियेबाबत विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी जनजागृती करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी नवल किशोर राम ,यांनी आज दि. 29/12/2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे सर्व खासदार ,. आमदार व मान्यता प्राप्त राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीमध्ये आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन बाबत माहिती देऊन त्याचे प्रात्यक्षिक बैठकीमध्ये दाखविण्यात आले. यावेळी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन द्वारे होत असलेली निवडणूक प्रक्रिया विश्वासार्ह असून आता मतदाराला आपण केलेले मतदान त्याच उमेदवाराला झाले असल्याबाबत व्हीव्हीपॅट मशीनमध्ये सात सेंकदासाठी संबंधीत उमेदवाराचे नाव व चिन्ह स्लिपद्वारे दिसून येणार असून सदरची स्लिप व्हीव्हीपॅट मशीनमध्ये पडणार असल्यामुळे यात अधिक पारदर्शकता आलेली आहे. याबाबतची सविस्तर माहिती व शंकांचे निरसन बैठकीमध्ये करण्यात आले. यावेळी उपस्थित राजकीय प्रतिनिधी यांनी याबाबत माहिती प्राप्त करुन घेऊन व त्यांना असलेल्या शंका विचारुन शंकांचे निरसन करुन घेतले तसेच प्रत्यक्ष मशीन वर मतदान करुन पाहिले.
पुणे जिल्हयात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनबाबतची जनजागरुकता मोहिमेचा प्रारंभ जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. दि.29/12/2018 पासून 211 खडकवासला मतदार संघ व दि.04/01/2019 पासून इतर विधानसभा मतदार संघामध्ये या जनजागरुकता मोहिमेस सुरुवात करण्यात येत आहे. सदरची मोहिम 1 महिना ते 45 दिवसांच्या कालावधीपर्यंत सुरु राहणार आहे. यावेळी सदरची मशीन मतदान केंद्रस्थळावर व इतर मोक्याच्या ठिकाणी मोबाईल व्हॅन द्वारे प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहे. या प्रात्यक्षिकाचा मतदारांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन ही मतदाराला त्याने केलेल्या मतदानाची पडताळणी दाखविणारे, मतदानाबद्दल विश्वासार्हता निर्माण करणारी यंत्रणा आहे. या बाबतची जनजागृती मोहीम अत्यंत सूक्ष्मपणे व काटेकोरपणे राबविण्यात यावी. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनबाबत मतदारामध्ये कोणत्याही प्रकारची साशंकता आणि संभ्रम राहणार नाही यासाठी मोहिम कालावधी मध्ये योग्य प्रकारे प्रात्यक्षिक दाखवून त्यांच्या शंकाचे निरसन करण्याच्या सूचना उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना मा. जिल्हाधिकारी यांनी दिल्या. तसेच, या जनजागरुकता मोहिमेची माहिती जास्तीत जास्त ग्रामस्थांपर्यत पोहचविण्यासाठी याची योग्य प्रकारे प्रसार व प्रसिध्दी करण्याचे तसेच, ग्रामीण भागामध्ये या कार्यक्रमाची दवंडी देऊन पुर्व प्रसिध्दी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत. तसेच, याची सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक व अन्य लोकप्रतिनिधी यांना याबाबतची पुर्वकल्पना द्यावी. व त्यांना या प्रात्याक्षिकाच्या वेळी उपस्थित राहण्याची विनंती करण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या. सदर बैठकीस आमदार श्री. बाबूराव पाचर्णे, राष्ट्रवादी कॉग्रेस सरचिटणीस मोहनसिंग राजपाल, आमदार आढळराव पाटील यांचे प्रतिनिधी प्रकाश मरकळे, आमदार लांडगे यांचे प्रतिनिधी सचिन फोडके, , खासदार श्रीरंग बारणे यांचे प्रतिनिधी अविनाश सकपाळ, श्री.अरुण गायकवाड, सचिव पुणे शहर कॉग्रेस , कु.कांदबरी साळवी, भा.ज.पा. कसबा अध्यक्ष युवती आघाडी, प्रवीण करपे, कॉग्रेस कसबा अध्यक्ष , श्री. दिलीप वाल्हेकर, हवेली ता. राष्ट्रवादी कॉग्रेस, व इतर प्रतिनिधी उपस्थित होते.
पुणे जिल्हयात एकुण 7666 मतदान केंद्र असून या जनजागृती मोहिमेमध्ये मतदार संघामध्ये वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनचे क्रमांक कोणते आहेत याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. यासाठी प्रत्येक मतदार संघामध्ये दोन मोबाईल व्हॅनद्वारे याची प्रात्याक्षिके दाखविण्यात येणार आहेत.
आगामी लोकसभा निवडणूकीची पुर्वतयारी म्हणून लोकसभा निवडणूकीसाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आलेली असून या समित्यांच्या समन्वय/ नोडल अधिकारी यांची बैठक मा. जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीमध्ये निवडणूकीच्या अनुषंगाने आवश्यकती पुर्वतयारी करण्याच्या सूचना सर्व संबंधीत नोडल अधिकारी यांना देण्यात आल्या. याबैठकीसाठी श्रीमती. नयना गुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल , पुणे , . सुभाष डूंबरे, अतिरिक्त आयुक्त, महेश आव्हाड, अप्पर जिल्हाधिकारी , श्.प्रवीण देवरे, अप्पर जिल्हाधिकारी, श्रीमती. नयना गुरव, अप्पर जिल्हाधिकारी नोंदणी व मुद्रांक विभाग, पुणे , व इतर अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणूक 2019 च्या पुर्वतयारीबाबत उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती. मोनिका सिंह यांनी माहिती दिली.