पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांच्या वतीने ‘सहायक कक्ष अधिकारी पुर्व परीक्षा– 2016′ रविवार, दि. 31 जूलै, 2016 रोजी पुणे शहरातील 52 केंद्रांवर होणार आहे. परीक्षेचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पुणे शहराचे पोलीस सह आयुक्त सुनिल रामानंद यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता सन 1973 चे कलम 144 अन्वये परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश रविवार दि. 31जुलै, 2016 रोजी सकाळी 8.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत यावेळेसाठी जारी केला आहे.
या आदेशान्वये परीक्षा केंद्राच्या इमारतीच्या 100 मीटर परिसरात एस.टी.डी., फॅक्स, झेरॉक्स बुथ, इंटरनेट सुविधा अगर इतर तत्सम सुविधांचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. परीक्षा केंद्राच्या इमारतीपासून 100 मीटर पसिरात ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास व परिसरात परीक्षेस बसणारे उमेदवार यांच्याखेरीज अनधिकृत व्यक्तीस तसेच वाहनांना प्रवेश मनाई करण्यात आली आहे. परिक्षा केंद्राचे इमारतीत परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांना मोबाईल आणण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लघंन करणारी व्यक्ती कायदेशीर शिक्षेस पात्र राहील, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.


