पुणे, दि.27: संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती इमारतीजवळील पुतळयास पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले. त्यानंतर उपस्थितांना शुभेच्छा देवून भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
यावेळी समाजकल्याणचे भिमराव खंडाते, समाज कल्याणचे प्रादेशिक उप आयुक्त संजय दाने, प्रांताधिकारी भाऊसाहेब गलांडे, समाज कल्याणचे सह आयुक्त माधव वैद्य, विजयकुमार गायकवाड, विशाल लोंढे, मल्लीनाथ हारसुरे, लोखंडे, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, समाज कल्याण अधिकारी हरिष डोंगरे कर्वे समाज सेवा संस्थेचे दिपक कर्वे, अंजली मायदेव, प्रीती शेलार, अंकिता खडके, प्रज्ञा जाधव, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.