वृक्षलागवड मोहीम यशस्‍वी करा- जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

Date:

पुणे- जिल्‍ह्यातील वनाच्‍छादीत क्षेत्राचे प्रमाण कमी असून ते वाढण्‍यासाठी वृक्षलागवडीचा महत्‍त्‍वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्‍यात आला आहे. जिल्‍ह्यातील सर्व संबंधित विभागांनी योग्‍य ते नियोजन करुन हा कार्यक्रम यशस्‍वी करावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले. जिल्‍हाधिकारी कार्यालयात वृक्षलागवड नियोजनाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक श्रीलक्ष्‍मी ए., रोजगार हमी योजनेचे उपजिल्‍हाधिकारी सुधीर जोशी  तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्‍ह्याला या वर्षी 1 कोटी 42 लक्ष 52 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्‍ट असून प्रत्येक विभागाने उपलब्‍ध रोपे, लागवडीची जागा, वृक्षसंरक्षक जाळी याबाबतचे नियोजन तयार करावे,अशा सूचना जिल्‍हाधिकारी राम यांनी दिल्‍या. प्रत्‍येक विभागाला जिल्‍हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्‍ध करुन दिला जातो.  या निधीच्‍या 0.5 टक्‍के निधी वृक्षारोपणासाठी लागणा-या बाबींवर खर्च करता येऊ शकतो. त्‍यातून खड्डे खोदणे, वृक्षसंरक्षक जाळ्या आदींचा खर्च भागवता येईल. जिल्‍हा परिषद, कृषी विभागासह इतर सर्व विभागांनी योग्‍य ते नियोजन करुन हा कार्यक्रम यशस्‍वी करावा, असे आवाहन राम यांनी केले.

गतवर्षी लावण्‍यात आलेल्‍या रोपांच्‍या  सद्यस्थितीचाही यावेळी आढावा घेण्‍यात आला. वृक्षलागवड कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी तहसिलदार, गटविकास अधिकारी, लागवड अधिकारी यांची बैठक घेण्‍यात येणार असल्‍याचेही यावेळी सांगण्‍यात आले.  आभार सहायक वनसंरक्षक वैभव भालेराव यांनी मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाइपलाइन गॅस व सीएनजी वितरणासाठी केंद्र सरकारचा नवा आदेश: विना अडथळा खोदकाम करता येणार

पुणे : केंद्र सरकारने देशभरात नैसर्गिक गॅस व पेट्रोलियम...

पुण्यात ४२४ प्रकरणांत गंभीर फेरफार अनियमितता:महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील ‘कलम १५५’ चा गैरवापर

दोषींवर निलंबनासह कठोर कारवाईचे महसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश जबाबदार...

हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

शाहिरी-गायन-वादन सादरीकरणातून स्वराज्य संकल्पनेचा जागर पुणे, दि. २६ मार्च :महाराष्ट्र...

शिवसृष्टी प्रकल्पासह शहराच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका – नगरसेवक हर्षवर्धन मानकर

पुणे महानगरपालिकेच्या सन २०२६–२७ च्या अंदाजपत्रकावर झालेल्या चर्चेदरम्यान नगरसेवक...