पुणे – प्रसंगावधान राखून प्रवाशांचे प्राण वाचविल्याबद्दल राज्य परिवहन
विभागाचे सहाय्यक सतीश वैजनाथ बोळगावे यांचा आज जीवनरक्षा पुरस्कार देऊन
गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते श्री. बोळगावे यांना
चाळीस हजार रुपयांचा धनादेश, मानपत्र आणि पदक देऊन गौरविण्यात आले.
11 एप्रिल 2014 रोजी शिवनेरी बसमधून सहाय्यक म्हणून सेवा करीत असताना
चालकाला ह्दयविकाराचा धक्का आला होता. त्यावेळी श्री. बोळगावे यांनी बस
व्यवस्थित बाजूला आणली त्याचबरोबर चालकांस इस्पितळात दाखल करून त्यांचे प्राण
वाचवले. त्यामुळे त्यांची जिल्हा प्रशासनाच्यावतीने या पुरस्कारासाठी शिफासर करण्यात
आली होती. तो केंद्र सरकारकडून मंजूर होऊन आला. आज जिल्हाधिकारी
कार्यालयातील कार्यक्रमात त्यांना जिल्हाधिकारी राव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, विक्रांत
चव्हाण आदी उपस्थित होते.

