– रविंद्र बेडकीहाळ
पुणे – आचार्य अत्रेंची पत्रकारिता तरुण पत्रकारांसाठी प्रेरणादायी आहे. पत्रकार म्हणून त्यांनी केलेले कार्य उत्तुंग आहे, असे प्रतिपादन सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष रविंद्र बेडकीहाळ यांनी केले.
येथील आचार्य अत्रे प्रतिष्ठान तर्फे विनोद विद्यापीठ, शिवाजीनगर येथे आयोजीत साहित्य सम्राट आचार्य अत्रे स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी आचार्य अत्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. बाबुराव कानडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
बेडकीहाळ म्हणाले, पत्रकार म्हणून काम करतांना अत्रेंनी नेहमी अन्याया विरूद्ध लढा दिला. त्यांचे मराठा दैनीकातील लिखाण हे क्रांतिकारी होते. त्यांचे अग्रलेख प्रभावी होते आणि नेहमी जनसामन्यांची बाजू मांडणारे होते. वाचकांवर त्यांच्या लिखाणाचा मोठा पगडा होता. मराठी मनाचा प्रतिनिधी म्हणून अत्रेंनी दैनिक मराठा नावारुपाला आणले. पत्रकार म्हणून अत्रेंनी त्यांच्या लेखणीचे शस्त्र करीत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात क्रांतीचे बीज पेरले. अत्रेंनी महाराष्ट्राचा पुढील 50 वर्षाचा राजकीय आणि सामाजिक विचार त्यांच्या पत्रकारीतेतून मांडला त्यामुळे त्यांना दृष्टा पत्रकार म्हणून संबोधण्यात आले आहे.
बेडकीहाळ यांनी या व्याख्यानाच्या निमित्ताने अत्रे यांच्या पत्रकारीतेवर प्रकाश टाकला तसेच या क्षेत्रात अत्रेंनी दिलेल्या योगदानाची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
व्याख्यानास मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते