पुणे दि. 2– सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य व सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांच्या अधिपत्याखाली अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी व विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये तसेच त्यांची शैक्षणिक प्रगती उंचवण्यासाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथे निवासी शाळा सुरू करण्यात आली आहे.
इयत्ता सहावी ते दहावी पर्यंतचे वर्ग, मोफत शैक्षणिक पुस्तके व स्टेशनरी, मोफत राहण्याची व भोजनाची सोय, मोफत शालेय गणवेश, अंथरुण व पांघरुणाची संपूर्ण सोय, अनुभवी व तज्ञ मार्गदर्शक, सुसज्य इमारत व भव्य क्रिडांगण, शालेय उपक्रमांचे आयोजन, सुसज्य प्रयोगशाळा व ग्रंथालय, अश्या सोयी सुविधा या शाळेमध्ये पुरविण्यात येणार आहेत. शैक्षणिक वर्ष 2018 – 19 च्या प्रवेश प्रक्रियेस सूरवात झाली असून विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.