पुणे- येथील फर्ग्युसन विद्यालय आयोजित रा.ना.दांडेकर संस्कृत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत स.प.महाविद्यालयाच्या ‘उमारङ्गः’ या एकांकिकेने सांघिक प्रथम क्रमांक पटकावला. याशिवाय तीन वैयक्तिक पारितोषिकेही विद्यार्थ्यांनी प्राप्त केली. अभिनय प्रथम- आकांक्षा ब्रह्मे व दर्शन वझे, दिग्दर्शन प्रथम – सुधर्म दामले. “संगीत जय जय गौरीशंकर” या विद्याधर गोखले यांच्या मूळ नाटकाचा संस्कृत अनुवाद व रंगावृत्ती संस्कृत विभागाने सादर केली व याकरिता विद्याधर गोखले यांच्या कन्या शुभदा दादरकर यांचे मोलाचे सहकार्य आणि महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या डॉ.भारती बालटे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी संघाचे अभिनंदन व कौतुक प्राचार्य डॉ. दिलीप शेठ, उपप्राचार्य डॉ.अशोक चासकर, उप संचालक मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांच्या उपस्थितीत महाविद्यालयात करण्यात आले.
संस्कृत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत स.प.महाविद्यालय प्रथम
Date:

