पुणे, दि. 6- अपंग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणेच्या वतीने राज्यातील दिव्यांग व्यक्तींना कौशल्य विकास विषयक प्रशिक्षण देण्याच्या अनुषंगाने दि. 15 व 16 फेब्रुवारी 2018, रोजी अल्पबचत भवन, पुणे येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 या कालावधीत ‘ दिव्यांगासाठी दिशा कौशल्य विकासाची ’ या विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्याशाळेच्या माध्यामातून दिव्यांग व्यक्तींना त्यांच्यामध्ये असलेल्या कौशल्यांचा विकास कसा करावा, याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे, त्यासाठी नामाकिंत तज्ञ व्यक्तींना बोलवण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे तसेच त्यांना आत्मनिर्भर बनविणे यादृष्टीने या कार्यशाळेत प्रयत्न केला जाणार आहेत, असे अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी कळविले आहे.