विंदांच्या आठवणींना उजाळा देणारा विशेष कार्यक्रम
मुंबई : राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने येत्या 4 जानेवारी रोजी ‘मराठी भाषा पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. या पंधरवड्यानिमित्त ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी गोविंद विनायक करंदीकर अर्थात विंदा करंदीकर यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या विशेष कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे.
प्रभादेवी येथील पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे होणाऱ्या या कार्यक्रमात ‘देणाऱ्याने देत जावे..’ अशा विंदांच्या अभूतपूर्व कवितांचे गायन, अभिवाचन आणि त्यांच्यावरील लघुपटांचे सादरीकरण रसिकांसाठी आयोजित करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून याची वेळ सायंकाळी 5 ते 7 अशी आहे, असे सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी कळविले आहे.


