पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे मातंग समाज व तत्सम 12
पोटजातीतील इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्याक्रमामध्ये विशेष प्राविण्य(80 टक्क्यापेक्षा जास्त गुण) मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनींना “साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेशिष्यवृत्ती” मंजूर करण्यात येते. शिष्यवृत्ती मिळण्यासाठी संबधितांनी त्यांचे अर्ज जिल्हा व्यवस्थापक, साहितयरत्नलोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, 424, मंगळवार पेठ, पुणे-411 011 येथे सादर करावेत.
अर्जासोबत जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, शिधापत्रिकेची छायांकित प्रत, गुणपत्रक, पुढील वर्गातप्रवेशाबाबतचा पुराव्यासह 12 जुलै,2016 अखेर अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास
महामंडळातर्फे कर्जाचे वितरण
पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातर्फे
महामंडळातर्फे थेट राबविल्या जाणाऱ्या योजनेमधून सन 2012-13, 2013-14 व 2014-15 या कालावधीतील कर्ज वितरण झालेल्या लाभार्थीची यादी साहितयरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, 424,मंगळवार पेठ, पुणे-411 011 येथे प्रसिध्द करण्यात आली आहे. यादीतील तपशीलात लाभार्थींच्या नावासमोर जीरक्कम दर्शविण्यात आली ती पूर्ण रक्कम संबधित लाभार्थीला मिळाली नसेल किंवा कर्ज वितरणाबाबत काही तक्रारअसल्यास त्यांनी दूरध्वनी क्रमांक 022-22672585, 022-25751485 अथवा hccidcrikb@gmail.com ईमेल पत्त्यावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

