पुणे, दि. 18 : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत किरकोळ केरोसीन परवाना मंजुरीसाठी जाहिर प्रकटन देण्यात आले होते. या जाहिर प्रगटनाद्वारे पुणे जिल्हयातील नवीन कायमस्वरुपी रास्तभाव दुकानांचे परवाने मिळण्यासाठी स्वयंसहायता बचत गटांनी अर्ज करण्याचे सूचित करण्यात आले होते. या जाहिर प्रगटनाद्वारे पुणे जिल्हयातील किरकोळ केरोसीन परवाने मिळण्यासाठी स्वयंसहायता बचत गटांनी अर्ज करण्याचे सूचित करण्यात आले होते. अन्न,नागरी पुरवठा व गा्रहक संरक्षण विभागाच्या सूचनेनुसार नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी झालेल्या संस्था, महिला स्वयंसहायता महिला बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था या प्राधान्यक्रमानुसार किरकोळ केरोसीन परवाना मंजूर करण्याची कार्यवाही करण्याचे सूचित करण्यात आले आहे. यासाठी अर्ज करण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्यात आली असून, 31 ऑक्टोबर 2017 पर्यंत अर्ज स्विकृतीचा कालावधी वाढविण्यात आला आहे. तरी अर्जदार यांनी विहीत नमुन्यातील अर्ज मुदतीतच सादर करावेत. यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.