पुणे,दि. 12: जुन्नर तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणून ओळखला जातो. या तालुक्याचा विकास करणे हे आवश्यक आहे. त्यासाठी जास्तीत जास्त निधी कशा पद्धतीने मिळवता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न करू. लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी दोघांनी समन्वयाने काम केल्यास हे सहज शक्य आहे,असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा तथा पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे केले.शासकीय विश्रामगृह पुणे येथे आयोजित जुन्न्नर तालुक्यातील विविध विषयासंदर्भातील आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे,जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) सुवेज हक तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत त्यांनी विविध विभागांच्या कामाचा आढावा घेतला तसेच अधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.सकारात्मकतेने जनतेसाठी विकासाची कामे करत राहावीत, अशा सूचना त्यांनी केल्या.