पुणे, दि. 6 : प्रादेशिक परिवहन, पुणे व वाहन उत्पादक यांच्या संयुक्त विद्यामाने शुन्य प्रदुषण करणाऱ्या, विजेवर चालणाऱ्या विविध प्रकारच्या वाहनांचे प्रदर्शन 8 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 10-30 ते 6 यावेळेत प्रादेशिक परिवहन कार्यालय, डॉ. आंबेडकर रोड, संगम पुलाजवळ, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात दुचाकी स्कुटर, ऑटोरिक्षा, कार इत्यादी विजेवर चालणाऱ्या विविध उत्पादकांची वाहने व त्यांचे सुटे भाग प्रदर्शित करण्यात येणार आहेत. वाहन तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्या नागरिकांनी, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी, पर्यावरण प्रेमी नागरीकांना आधुनिक वाहन तंत्रज्ञान समजून घेण्याची ही सुवर्णसंधी असुन ती त्यांनी प्राप्त करावी. सदर प्रदर्शन पाहण्यासाठी प्रवेश मुक्त आहे. तसेच याप्रसंगी वरील तंत्रज्ञानावर आधारित कार्यशाळेचे आयोजन केले असून त्यामध्ये तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व नागरीकांनी, विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी केले आहे.