पुणे, दि. 6: आगामी दिवाळी उत्सवानिमित्त ऑक्टोबर 2017 मध्ये खेड उपविभाग खेड (राजगुरुनगर) या उपविभागात शोभेची दारु व फटाका विक्रीचे तात्पुरते परवाने उपविभागीय दंडाधिकारी खेड, उपविभाग खेड (राजगुरुनगर) यांचे कार्यालयामार्फत देण्यात येणार आहे. त्यासाठी पुढील पध्दत अवलंबिवली जाणार आहे.
अर्ज साध्या कागदावर उपविभागीय दंडाधिकारी खेड, उपविभाग खेड (राजगुरुनगर) या पत्यावर दिनांक 16 ऑक्टोबर 2017 पुर्वी करावा. अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्जास रु 10 चे कोर्ट फी स्टँप लावणे आवश्यक आहे, ज्या जागेत व्यवसाय कारावयाचा आहे, त्या जागेचा मिळकत रजिष्टर उतारा, ग्रामपंचायत मिळकत उतारा, 7/12 उतारा जोडणे आवश्यक असून सदर जागा दुसऱ्याची असेल तर जागेचा वापर करणेस संबंधिताचे रु 100 चे स्टँप पेपरवर संमतीपत्र आवश्यक आहे, पोलीस निरीक्षक/सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचा शोभेची दारु, फटाके साठा व विक्री करणेच्या सुरक्षिततेबाबत आणि दंड व शिक्षा झाली आहे किंवा कसे? याबाबतचे प्रमाणपत्र तसेच ना हरकत प्रमाणपत्र व व्यवसायाची जागा सुरक्षित असलेबाबत प्रमाणपत्र आवश्यक आहे. नगरपरिषद यांचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे, नगरपरिषद हद्दीतील मालकीची स्टॉलसाठी जागा दिलेचे पत्राची प्रत, अर्जासोबत परवाना फी रु 600 कार्यालयात शासकीय पावतीने जमा करुन त्याची मूळ प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे, अशी माहिती उपविभागीय दंडाधिकारी खेड, उपविभाग खेड (राजगुरुनगर) यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.