पुणे दि 2: पुणे –नाशिक राष्ट्रीय महामार्गा दरम्यान नाशिक फाटा ते राजगुरुनगर पर्यंतच्या प्रस्तावित महामार्ग रुंदीकरणाची पाहणी पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली.
या प्रस्तावित रुंदीकरणामध्ये 45 मीटर ते 60 मीटर महामार्गाची रुंदी करण्यात येणार आहे. हा महामार्ग सहापदरी करण्यात येणार आहे, या करीता आवश्यक भूसंपादनाची कामे पूर्णत्वास आली असून पी.सी.एम.एलच्या वाहतुकीसाठी बीआरटी करीताही नियोजन करण्यात येणार आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या सर्व्हीस रोडला जोडण्यासाठी 1 ते 1.5 किलो मीटरच्या अंतरावर भुयारी मार्ग तसेच महामार्गावरुन सर्व्हीस रोडला जोडण्यासाठी इलेवेटेड रोड बांधण्यात येणार आहे मुळे स्थानिक वाहतुक व वाहनकोंडी विषयक समस्या मोठया प्रमाणात सुटणार आहे. पुढील 50 वर्षांपर्यंत या महामार्गावर वाहतुक कोंडी सारख्या समस्या उदभवू नये यासाठी नियोजन करण्यात येणार आहे.
यावेळी पालकमंत्र्यांनी राष्टीय महामार्गाचे अधिकाऱ्यांसमवेत रुंदीकरणा विषयी बैठकीत कामांचा आढावा घेवून येणाऱ्या नियोजनकरण्याबाबत सूचन दिल्या. यावेळी आमदार महेश लांडगे उपस्थित होते. बैठकीनंतर पालकमंत्री वआमदार लांडगे यांनी राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता व अधिकारी यांच्या समवेत महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करुन या महामार्गावरील अरुंद रस्ते वाहतुक कोंडी होणारे चौक व भूसंपादन करावयास लागणाऱ्या क्षेत्राची पाहणी केली. या प्रस्तावित रुंदीकरणाच्या कामाचा अहवाल व रस्त्यांचे अद्ययावत नकाशे तातडीने करण्याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

