पुणे : राज्य शासनाच्यावतीने वनमहोत्सवानिमित्त राज्यभरात एक जुलै या एकाच दिवशी दोन कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यात 16 लाख 27 हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. प्रशासनाच्या योग्य नियोजन व समन्वयामुळे वृक्षलागवडीचे उद्दीष्टपूर्ती होवून जिल्ह्यात शुक्रवारी पाच वाजेपर्यंत 19 लाख 3 हजार वृक्षलागवड करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी 33 टक्के वनच्छादित प्रदेश असणे आवश्यक आहे. मात्र वनाच्छादित प्रदेश कमी असल्याने राज्य शासनाने वनमहोत्सवाचे आयोजन केले होते. या अंतर्गत 1 जुलै या एकाच दिवशी राज्यात दोन कोटी वृक्षलागवड करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. यासाठी शासनाच्या सामाजिक वनीकरण व वन विभागाबरोबच इतर विभागांनाही वृक्षलागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. यासाठी शासनाने सामन्य जनतेला व विविध सामाजिक संस्थांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले होते.
या कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यासाठी 16 लाख 27 हजार वृक्षलागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अत्यंत काटेकोर नियोजन केले होते. या वृक्ष लागवडीसाठी जिल्ह्यातील 930 ठिकाणे निश्चित करण्यात आली होती. यासाठी 21 हजाराहून अधिक रोपे उपलब्ध करुन ठेवण्यात आली होती. योग्य नियोजन आणि समन्वयामुळे हे उद्दीष्ट साध्य झाले असून शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सामाजिक वनीकरण विभाग व वन विभागाच्यावतीने 12 लाख 31 हजार तर इतर विभागाच्यावतीने 6 लाख 72 हजार अशी मिळून 19 लाख 3 हजार वृक्षलागवड करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
photo–पुणे येथे स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडीच्या उद्घाटनासाठी आलेल्या ग्रामविकासआणि जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी येथील विधान भवन परिसरात वृक्षलागवड केली. यावेळी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई आदी

