पुणे: मुलींना स्मार्ट करण्यासाठी समाजातील सर्व लोकांनी स्मार्ट होण्याची आवश्यकता असून या मुळे समाजाचा विकास होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन अन्न व नागरि पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
अल्पबचत भवन येथे पुणे जिल्हा परिषद, भारतीय जैन संघटना व सलाम मुंबई फाऊंडेशनच्यावतीने घेण्यात येणाऱ्या ‘स्मार्ट गर्ल टू बी हॅपी, टू बी स्ट्रॉग’ या दोन दिवसीय कार्यशाळेचे व तंबाखू मुक्त शाळा अभियानाची घोषणा व उद्घाटन समारंभादरम्यान ते बोलत होते. यावेळी खा. सुप्रिया सुळे, खा. अनिल शिरोळे, जलसंपदा राज्य मंत्री विजय शिवतारे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा व सलाम मुंबई फाऊंडेशनच्या राजेश्री कदम उपस्थित होत्या.
पालकमंत्री श्री बापट म्हणाले, शिक्षण घेणाऱ्या मुलांवर चांगले संस्कार करणे अत्यंत आवशक आहे. चांगले संस्कार हे मुलांमध्ये चांगला स्वभाव व वागणूक रुजवतात. यामुळे राज्य व देशाच्या बळकटिकरणात भर पडते. मुलींना स्मार्ट बनविण्यासाठी सर्व प्रथम समाजातील सर्व लोकांना स्मार्ट बनणे आवशक आहे म्हणून पहिली सुरुवात स्वत:ह पासून करा. कुटुंब व्यवस्था कोलमडू देवू नका, ती टिकवा. विज्ञानाच्या चांगल्या गोष्टींचा उपयोग करा व दुरुपयोग टाळा. स्मार्ट गर्ल टू बी हॅपी, टू बी स्ट्रॉग या अभियानाद्वारे इयत्ता 8 वी, 9वी, 10वी, 11वी व 12वी तील मुलींना सामाजिक आव्हानांना तोंड देण्यास तयार करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील विद्यार्थिनींना सक्षम करण्यात मदत होणार आहे. तसेच श्री बापट यांनी तंबाखू मुक्त शाळा अभियाना बाबतीत सर्वांना व्यसन टाळण्याचे आवाहन केले.
यावेळी खा. सुप्रिया सुळे, खा. अनिल शिरोळे, राज्य मंत्री विजय शिवतारे व पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, यांची भाषणे झाली. कार्यक्रमा दरम्यान उपस्थितांना स्मार्ट गर्ल टू बी हॅपी, टू बी स्ट्रॉग व तंबाखू मुक्त शाळा अभियानाची माहिती चित्रफिती द्वारे देण्यात आली.
कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी व कर्मचारी. भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी तसेच सलाम मुंबई फाऊंडेशनचे सदस्य जिल्ह्यातील शिक्षक व प्राध्यापक मोठ्या संख्येणे उपस्थित होते.