पुणे : वनमहोत्सवानिमित्त राज्यभरात एकाच दिवशी दोन कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत विभागीय आयुक्त एस चोक्कलिंगम यांच्या हस्ते येथील विधान भवन परिसरात आज वृक्षलागवड करण्यात आली.
यावेळी अप्पर आयुक्त श्याम देशपांडे, जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी दौलत देसाई, निवासी उप जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योती कदम, उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे यांच्या हस्तेही वृक्षलागवड करण्यात आली. यावेळी महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

