पुणे- येथील जिल्हा माहिती अधिकारी तथा व्यंगचित्रकार राजेंद्र सरग यांना ‘दिवा प्रतिष्ठान’ चा सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रकाराचा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेत आयोजित कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक ल.म. कडू, उद्योजक भारत देसडला, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय पाध्ये, कार्यवाह शिवाजी धुरी, चंद्रकांत शेवाळे, अरुण जाखडे, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलींद जोशी, भारतभूषण पाटकर, महेंद्र देशपांडे, ह.ल. निपुणगे, ज्ञानेश्वर जराड, सुनील गायकवाड, सुभाष खुटवड, स्नेहसुधा कुलकर्णी, अंजली पोतदार, नसीर शेख, डॉ. अरविंद संगमनेरकर, डॉ. सतीश देसाई, ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, विश्वास सूर्यवंशी, सन्ना मोरे आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. याच कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट वाचकाचा प्रथम पुरस्कार रागिनी पुंडलिक (पुणे), द्वितीय पुरस्कार कल्पना चिंतामणराव मार्कंडेय (औरंगाबाद) आणि तृतीय पुरस्कार सौरभ साबळे (मलकापूर कराड) यांना प्रदान करण्यात आला. ‘दिवा प्रतिष्ठान’ ही दिवाळी अंकांच्या संपादकांची संघटना आहे. या संघटनेच्यावतीने दरवर्षी वाचक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.