पुणे : धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे बाहुल्य असलेल्या, शासनमान्य शैक्षणिक संस्थांना पायाभूत
सोयी सुविधा उपलब्ध करुन देऊन शिक्षणाचा गुणात्मक दर्जा उंचवण्यासाठी अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी
शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळामध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी
शासनातर्फे अनुदान देण्यात येते.
सदर योजनेअंतर्गत सन 2017-18 या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य
खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळा यांनी यासंदर्भातील परिपुर्ण प्रस्ताव
18 सप्टेंबर, 2017 पर्यंत जिल्हा नियोजन कार्यालय, जुनी जिल्हा परिषद इमारत, 3 रा मजला, पुणे येथे कार्यालयीन
वेळेत सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, अल्पसंख्यांक उच्चस्तरीय निवड समिती पुणे यांनी
प्रसिध्दीपत्राद्वारे केले आहे.