पुणे, दि.15- स्वातंत्र्य दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारवाड्यावर सकाळी 7.30 वाजता जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उपजिल्हाधिकारी सर्वश्री, शंकरराव जाधव, मोनिका सिंग, दिनेश भालेदार, ज्योती कदम, महसूल आणि इतर विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.