वारीसाठी 2 कोटी 7 लाख रुपये : अर्थमंत्री मुनगंटीवार
पुणे: लाखो वारकरी दरवर्षी मोठया भक्तीभावाने पंढरपूरला जातात. या वारीसाठी राज्यशासनाने 2 कोटी 7 लाख रुपये देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची घोषणा अर्थमंत्रीसुधीर मुनगंटीवार यांनी केली.देहू येथे श्री संत तुकाराम पालखी प्रस्थान सोहळयाच्या प्रसंगी बोलत होते. यावेळी अर्थमंत्री सुधीरमुनगंटीवार, पालकमंत्री गिरीश बापट, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, सामाजिक न्यायराज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार, अमरसाबळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विश्वनाथ कराड आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना अर्थमंत्री मुनगंटीवार म्हणाले की, दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूर येथे वारीसाठीयेतात. पंढरपूरच्या व्यवस्थेसाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. वारक-यांसाठी चंद्रभागा नदीशुध्दीकरणासाठी नमामी चंद्रभागा प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याव्दारेचंद्रभागा निर्मल स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले.याप्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की, या पालखी साहळयासाठी आम्ही वारकरी म्हणूनआलो आहोत. राज्य शासनाने वारक-यांना वारीत त्रास होऊ नये, तसेच स्वच्छतेसाठी अनेक योजना केल्याजात आहेत. अतिशय उत्साही आणि मंगलमय वातावरणात या पालखी सोहळयास सुरुवात झालेली आहे.पालकमंत्री म्हणून सर्वांचे स्वागत केले.यावेळी पाणी पुरवठामंत्री बबनराव लोणीकर, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांचीही समयोचित भाषणे झाली.
देहू पालखी प्रस्थान सोहळ्याची पहा क्षणचित्रे










