पुणे,: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना आज जयंती दिनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. विधानभवन परिसरात झालेल्या कार्यक्रमात तहसिलदार रोहिणी आखाडे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
यावेळी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय माहिती कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

