पुणे: जागतिक ग्राहक दिनानिमित्त बुधवार दि. 15 मार्च रोजी स्वारगेट बसस्थानक, पुणे येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमात सकाळी 10 ते 5 या वेळेत विविध ग्राहक प्रबोधनपर कार्यक्रम होणार आहेत.
कार्यक्रमाअंतर्गत विविध विभागांच्या वतीने ग्राहकांच्या मार्गदर्शनासाठी वस्तुस्वरुप प्रदर्शनाचे आयोजन देखील करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.