पुणे : स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आज आदरांजली वाहण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झलेल्या या कार्यक्रमात आज सकाळी 11 वाजता पाच मिनिटे स्तब्धता राखून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव, अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त कविता द्विवेदी, महसुल विभागाचे उपायुक्त एस.पी.तेलंग, पुरवठा विभागाच्या उपायुक्त निलीमा धायगुडे, पुर्नवसन विभागाचे उपायुक्त दिपक नलावडे, रो.ह.यो चे उपायुक्त अजित पवार, तसेच जिल्हाधिकारी आणि जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.