पुणे, दि. 23 – स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनानिमित्त आज जिल्हा प्रशासनातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम व जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर आयुक्त संपदा मेहता,अपर जिल्हाधिकारी रमेश काळे,महसूल विभागाचे उपायुक्त सुधाकर तेलंग,सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त कविता द्विवेदी,करमणुक कर विभागाचे उपायुक्त निलेश सागर,निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व माहिती कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.