दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

Date:

मालिकेतील आकर्षक क्रमांक लिलाव पद्धतीने चारचाकींसाठी राखून ठेवता येणार

पुणे, दि. 14 : पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी ‘केए’ ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांकासाठी दुचाकी वाहनांबाबत आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी –चिंचवड, नवीन इमारत, मोशी येथे मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते व त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो. तसेच यामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा आणि हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने तो मिळावा यासाठी ही कार्यपद्धती सुरू करण्यात आली आहे. ज्या चारचाकी वाहन मालकांना नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित तीनपट शुल्क भरून हवे असतील त्यांनी 16 मार्च रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते दुपारी 2.30 वा.पर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा.

दुचाकी मालिकेतील उर्वरित आकर्षक नोंदणी क्रमांक दुचाकी वाहनांसाठी आरक्षित करण्यासाठी 17 मार्च रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते दुपारी 2.30 या दरम्यान विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा.

अर्ज कार्यालयाच्या नवीन वाहन नोंदणी विभागात धनाकर्ष (डीडी), पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह आधारकार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकासह जमा करावा. हा डीडी ‘DY.R.T.O. PIMPRI CHINCHWAD’ यांच्या नावे राष्ट्रीयकृत, अनूसचित बँकेचा पुणे येथील असावा. अर्जदाराने ओळख पटविण्यासाठी अर्जासोबत फोटो ओळखपत्र तसेच पत्त्याच्या पुराव्यासाठी आधारकार्ड, दूरध्वनी देयक आदींची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे.

चारचाकी वाहनांसाठी क्रमांकांची यादी 17 मार्च रोजी सकाळी कार्यालयीन सूचना फलकावर लावण्यात येईल. यादीतील अर्जदारांना लिलावासाठी जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा असल्यास 17 मार्च रोजी दुपारी 2.30 वा. पर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा. डीडी जमा केला त्याच त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षात नोंदणी प्राधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पात्र व्यक्तीसमोर संबंधीत अर्जदार लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाणार आहे.

दुचाकीची यादी 21 मार्च रोजी कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. दुचाकीसाठी अर्जदारांना लिलावाकरीता जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा असल्यास 21 मार्च रोजी दुपारी 2.30 पर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा. त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षात नोंदणी प्राधिकारी यांच्या उपस्थितीत लिफाफे उघडून विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केलेल्या अर्जदारास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाणार आहे. वाहन क्रमांक आरक्षित केल्याचे मॅसेज मोबाईलवर आल्यानंतर पाचव्या दिवशी पावती कार्यालयातून मिळणार आहे.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व शुल्क सरकारजमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी परत करता येणार नसल्याचे उप प्रादेशिक परिवह अधिकारी यांनी कळविले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आयसीआयसीआय बँकेची पुण्यात कॉर्पोरेट इकोसिस्टम शाखा

·         येथे 24x7 एटीएम सुविधेची सोय आहे. ·         कॉर्पोरेट इकोसिस्टीमसाठी बँकिंग सेवांची विस्तृत श्रेणी...

बाणेरमध्ये अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या हस्ते ‘कल्याण ज्वेलर्स’च्या नवीन दालनाचे उद्घाटन!

पुणे-बाणेर:  भारतातील सर्वात विश्वसनीय आणि अग्रगण्य ज्वेलरी कंपन्यांपैकी एक असलेल्या कल्याण ज्वेलर्सने आज पुणे, महाराष्ट्र येथील बाणेर मेन रोडवरील गणराज चौक येथे आपल्या नवीन शोरूमचा शुभारंभ केला. सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्या हस्ते या शोरूमचे उद्घाटन करण्यात आले. या भागातील ब्रँडची उपस्थिती अधिक मजबूत करणे हे या शोरूमचे उद्दिष्ट आहे. या शोरूममध्ये कल्याण ज्वेलर्सची एकापेक्षा एक सरस उत्कृष्ट डिझाइन्स उपलब्ध आहेत, जसे की, मुहूर्त (लग्नाचे दागिने), मुद्रा (हस्तकला केलेले अँटिक दागिने), निमा (मंदिर शैलीतील दागिने) इत्यादी अनेक लोकप्रिय इन-हाऊस ब्रँड्स याठिकाणी उपलब्ध आहेत. शाही थाट आणि डिझाइन्सचा खजिना असलेले हे बाणेरमधील नवे कल्याण ज्वेलर्स स्टोर खरेदीचा अतुलनीय अनुभव प्रदान करेल. यावेळी अभिनेत्री सोनाली बेंद्रे म्हणाल्या, "कल्याण ज्वेलर्सच्या या नवीन दालनाचे उद्घाटन करताना मला खूप आनंद होत आहे. विश्वास, पारदर्शकता आणि ग्राहक-निष्ठेला महत्त्व देणाऱ्या ब्रँडचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्यासाठी एक सन्मान आहे. मला खात्री आहे की, इथले दर्जेदार दागिने आणि उत्कृष्ट सेवा ग्राहकांच्या मनाला नक्कीच भुरळ घालतील!" नवीन शोरूमच्या उदघाटनाबद्दल बोलताना कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक श्री. रमेश कल्याणरामन म्हणाले, "बाणेरमध्ये हे नवे कल्याण ज्वेलर्स स्टोर, ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करणारे, दागिन्यांच्या खरेदीचे एक परिपूर्ण केंद्र ठरावे अशी आमची इच्छा आहे. जागतिक दर्जाच्या वातावरणात आणि सेवेतून एक उन्नत अनुभव देण्याची आमची वचनबद्धता कायम आहे, आणि तरीही आम्ही कल्याण ज्वेलर्सच्या विश्वास व पारदर्शकतेच्या चिरंतन मूल्यांशी घट्ट जोडलेले आहोत." या नवीन शुभारंभाच्या निमित्ताने, कल्याण ज्वेलर्सने स्टोअरमध्ये अनेक खास ऑफर्स जाहीर केल्या आहेत. साध्या सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर (Value Addition) प्रति ग्रॅम ७५० रुपये फ्लॅट सवलत, प्रीमियम आणि जडाव (Studded) दागिन्यांच्या मजुरीवर प्रति ग्रॅम १५०० रुपये फ्लॅट सवलत, तर टेम्पल आणि अँटिक दागिन्यांच्या मजुरीवर प्रति ग्रॅम १००० रुपये फ्लॅट सवलत देण्यात येत आहे. याशिवाय, 'कल्याण स्पेशल गोल्ड बोर्ड रेट' देखील लागू असेल, जो बाजारपेठेतील सर्वात कमी दर असून सर्व शोरूम्समध्ये एकसमान आहे. हे सर्व फायदे केवळ मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध आहेत. कल्याण ज्वेलर्समधील प्रत्येक दागिना हा 'बीआयएस' (BIS) हॉलमार्क असलेला असून त्यावर शुद्धतेच्या विविध चाचण्या केल्या जातात. याव्यतिरिक्त, ग्राहकांना ब्रँडचे सिग्नेचर '४-स्तरीय आश्वासन प्रमाणपत्र' (4-Level Assurance Certificate) मिळते, जे सोन्याची शुद्धता, दागिन्यांची आजीवन मोफत देखभाल (Free lifetime maintenance), उत्पादनाची सविस्तर माहिती आणि पारदर्शक एक्सचेंज व बाय-बॅक धोरणांची हमी देते. या शोरूममध्ये कल्याणचे लोकप्रिय 'हाऊस ब्रँड्स' देखील उपलब्ध असतील, ज्यात मुहूर्त (लग्नाचे दागिने), मुद्रा (हस्तकला केलेले अँटिक दागिने), निमा (मंदिर शैलीतील दागिने), ग्लो (डान्सिंग डायमंड्स), झिया (सॉलिटेअरसारखे हिऱ्यांचे दागिने), अनोखी (अनकट डायमंड्स), अपूर्वा (विशेष प्रसंगांसाठी हिरे), अंतरा (लग्नासाठीचे हिऱ्यांचे दागिने), हेरा (अगदी रोज वापरता येतील असे हिऱ्यांचे दागिने), रंग (मौल्यवान खड्यांचे दागिने) आणि अलीकडेच लाँच केलेले लीला (रंगीत खडे आणि हिऱ्यांचे दागिने) या कलेक्शन्सचा समावेश असेल.

‘अंमली पदार्थांमुक्त गोवा’कडे निर्णायक पाऊल; राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या नेतृत्वाखाली ३० दिवसांची मोहीम सुरू

सरन्यायाधीश सूर्यकांत आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत...