पुणे, दि. 27 : जागतिक जल दिवसाचे औचित्य साधून केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत ‘जलशक्ती अभियान: कॅच द रेन’ हे देशव्यापी अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाची जिल्ह्यात 20 डिसेंबर रोजी सुरुवात करण्यात आली असून त्याची प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी जिल्हा जलसंधारण अधिकारी सुजाता हांडे यांची जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जलशक्ती अभियानांतर्गत जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार आदिवासी विकास विभाग, कृषी विभाग, नगर विकास, भूजल सर्वेक्षण आणि विकास विभाग, जलसंपदा विभाग, महसूल व वने विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील अधिकाऱ्यांशी समन्वयाने जलशक्ती अंतर्गत कामे करण्यात येणार आहेत. अभियानाद्वारे पावसाच्या पाण्याचे संधारण करून भूजल पातळीत वाढ करण्याचे नियोजित आहे.
पावसाची अनियमितता लक्षात घेता जास्तीत जास्त पाणी स्थानिक पातळीवरच अडवून जिरविण्यासाठी प्राधान्य देण्याच्यादृष्टीने व त्याचे प्रबोधन करण्यासाठी जलशक्ती केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. पर्जन्य जल पुनर्भरणासाठी (रेन वॉटर हार्वेस्टिंग) बांधकाम व दुरुस्तीतून जास्तीत जास्त पाणी साठविण्यासाठी या मोहिमेद्वारे प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती श्रीमती हांडे यांनी दिली आहे.
सध्या अस्तित्वातील जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन, नूतनीकरण करणे व जलसंधारणाच्या विविध उपचारांद्वारे जलसाठा तयार करणे व ते अडवून जमिनीत जिरवणे व भूजल पातळीत वाढ करण्याचे उद्दिष्ट या मोहिमेंतर्गत साध्य केले जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व जलाशयांचे जिओ टगिंग करून एकत्रित माहिती संकलित करण्याचे देखील नियोजन असल्याचे यांनी माहिती

