महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पुस्तिकेचे प्रकाशन

Date:

पुणे दि.12: यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे महसूल व वन विभागांतर्गत आयोजित विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय महसूल परिषदेत आज महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पुणे विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या महसूल विभागाशी संबंधित शासन निर्णय पुस्तिका व उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी तयार केलेल्या भूसंपादन विषयक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम, जमाबंदी आयुक्त एन. के. सुधांशू, नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर, राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते.

दुपारी झालेल्या सत्रात जमाबंदी आयुक्त एन.के. सुधांशू यांनी अभिलेख अद्यावतीकरण कार्यक्रम, मोजणीच्या पारंपारिक व आधुनिक पद्धती या विषयावर सादरीकरण केले. त्यांनी भूमी अभिलेख अद्यावतीकरण, सातबारा संगणकीकरण, डेटा सुधारणा, प्रॉपर्टी कार्ड संगणकीकरण, इंटर लिंकेज, डॅशबोर्ड, अभिलेख डिजिटालायजेशन, तलाठी संबंधित समस्या, सातबारा सध्यस्थिती याबाबत मुद्देसूद माहिती दिली.

नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बिनशेती परवानगीबाबत सादरीकरण केले. बिनशेती परवानगीबाबत सुलभ कार्यप्रणाली, कामकाजातील सुसूत्रता, नाशिक विभागातील महत्वाचे अनुभव याबाबत त्यांनी माहिती दिली. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

अमरावती विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी ‘वाळू संबंधित धोरणांनुसार करावयाची कार्यवाही’ या विषयावर सादरीकरण केले. नांदेड जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आणि भंडारा अपर जिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

नागपूरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी ‘वाळू व्यतिरिक्त गौण खनिज संबंधित धोरणानुसार करावयाची कार्यवाही’ या विषयावर सादरीकरण केले. लिलाव कार्यपद्धती, औद्योगिक गौण खनिज लिलाव कार्यपद्धती, अल्पमुदतीचे परवाने, दंडात्मक कार्यवाही आदी विषयाबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...

पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचे तीन सदस्य काश्मीर मध्ये ठार मारले..

दहशतवादी एका टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मातीच्या घरात लपलेले आढळले...