पुणे, दि. २२:- आयुष मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांनी दिलेल्या निर्देशानुसार 21 जून २०२१ रोजी सातवा आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम आयुर्वेद विभाग ससून रुग्णालय पुणे ,बी जे वैद्यकीय महाविद्यालय पुणे आणि स्वस्थवृत्त विभाग टिळक आयुर्वेद महाविद्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना Be with Yoga Be at Home अशी आहे.
संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून 2015 वर्षापासून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे
वैदकीय अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे म्हणाले की, ५००० वर्षाहून अधिक परंपरा असणारी योग विद्या ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. त्यामुळे व्यक्तीचा शारीरिक,
मानसिक , अध्यात्मिक विकास होतो त्याच बरोबर श्वसन संस्था बळकट करण्यासाठी व रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी याची मदत होते. सध्याच्या कोविडच्या काळात योगाचा खूप चांगला उपयोग होतो आहे
त्यामुळे कोविड सेंटर मध्ये
दररोज योगा याबाबतचा सल्ला रुग्णांना दिला जातो
योगाचा उपयोग आजारी पडू नये ,आपले आरोग्य अबाधित राहावे म्हणून केला जातो तसेच आजारी असलेल्या रुग्णांना सुद्धा योगाचा उपयोग चांगला होतो .त्यामुळे मधुमेह रक्तदाब स्थौल्य आदी आजारावर योग तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विशिष्ट आसने आणि प्राणायाम केल्यास नक्कीच या आजाराचा प्रतिबंध आपण करू शकतो, असे डॉ. तांबे म्हणाले.
डॉ. तांबे म्हणाले, सध्या कोविडमुळे जनतेमध्ये भीती नैराश्य ताण तणाव वाढला आहे त्यामुळे यांच्या
समुपदेशनासोबत
त्यांना प्राणायाम,योगासने याचा उपयोग अत्यंत लाभदायी ठरणार आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने माझे सर्वांना आवाहन आहे की आपण दररोज वेळ काढून किमान एक तास योग आणि प्राणायाम करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
ससून रुग्णालयातील आयुर्वेद विभागामार्फत ससूनमध्ये येणाऱ्या विविध विभागातील रुग्णांना
त्यांना चालू असलेल्या उपचारासोबत
योग विषयक सल्ला व रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक उपचार देण्याबाबत आवाहन आयुर्वेद विभागाचे डॉ धर्माधिकारी यांनी केले.
टिळक आयुर्वेद महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ सदानंद देशपांडे यांनी टिळक आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त
निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, प्रश्नमंजूषा स्पर्धा इत्यादी
विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली.

