उरवडे येथे आग लागलेल्या रासायनिक कंपनीची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडून पाहणी

Date:

आगीच्या चौकशी अहवालानंतर जबाबदारी निश्चित होईल
 गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

पुणे, दि. 8 :- “मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आग कशामुळे लागली, याला जबाबदार कोण यासाठीच्या चौकशीसाठी शासनाने समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त होईल. चौकशीचा प्राथमिक अहवाल प्राप्त होताच आगीचे कारण स्पष्ट होऊ शकेल, व आगीच्या चौकशी अहवालानंतर जबाबदारी निश्चित होईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीची पाहणी करण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज सकाळी दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासमवेत खा.सुप्रिया सुळे,आ.संग्राम थोपटे, श्रीमती रुपाली चाकणकर,श्री संतोष मोहोळ यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, स्थानिक लोकप्रतिनिधी, एमआयडीसीचे अधिकारी यांच्याकडून या दुर्देवी घटनेची माहिती घेतली.
यावेळी वळसे पाटील म्हणाले, या उद्योगात अनेक गोष्टी ज्वलनशील असल्याने आग सगळीकडे पसरली असून आगीचे कारण,जबाबदार कोण याबाबतची कारवाई, अहवाल आल्या नंतर होईल. प्राथमिक अहवाल आजच प्राप्त होईल. डीएनए टेस्ट करूनच मृतदेह ओळखता येतील त्याशिवाय ओळखता येणार नाहीत, यासाठी ससूनमध्ये दोन ते तीन दिवस लागू शकतात.
खा. सुप्रिया सुळे यांनीही रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच शासकीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यभरात हरवलेल्या ४८ हजार २७८ पैकी ३६ हजार ५८१ महिलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश

मुंबई- राज्यात गेल्या वर्षभरात तब्बल ४८ हजार २७८ अल्पवयीन...

9 मार्चला महापालिकेत येणार 10 स्वीकृत नगरसेवक

पुणे- महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळालेल्या,अगर थोड्या मतांनी पराभूत...

प्रज्ञा सातव यांचा राजीनामा दबावाखाली?:विरोधकांचा विधान परिषदेमध्ये गदारोळ

मुंबई-काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदार प्रज्ञा सातव...