उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ पुणे उपक्रमास मोठा प्रतिसाद

Date:

८१ टक्के प्रश्न सकारात्मकपणे निकाली

पुणे, दि. १८- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आयोजित उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ पुणे या उपक्रमास पुण्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील ९२० प्राप्त तक्रारी व निवेदानांवर यावेळी चर्चा करण्यात आली व त्यातील ७५० अर्ज सकारात्मकपणे निकाली काढण्यात आली. प्राप्त तक्रारी, निवेदनांपैकी ८१.५२ टक्के प्रकरणे मार्गी लागल्याने सर्वांमध्येच आनंदाची भावना असल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ पुणे या उपक्रमाचे आयोजन १८ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून विद्यापीठाच्या इनडोअर हॉल येथे करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्वतः प्रत्येक प्रकरण हाताळत निवेदनांचा निपटारा केला. यावेळी खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, तंत्रशिक्षण संचालनालयाचे डॉ. अभय वाघ, राज्य सामाईक परीक्षा विभागाचे चिंतामण जोशी, कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा, ग्रंथालय संचालनालयाच्या संचालिका शालिनी इंगोले तसेच मंत्रालय स्तरावरील अधिकारी उपस्थित होते.
उपक्रम झाल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना उदय सामंत म्हणाले, आजपर्यंत एकूण ४ हजार ४११ अर्जांपैकी ४ हजार ५३ अर्जावर सकारात्मक निर्णय झाला आहे.
आजच्या पुणे येथील उपक्रमात आलेल्या ऑनलाईन अर्जांपैकी ५१९ हे पुणे जिल्ह्यातील, १०९ नाशिक, ६२ अहमदनगर तर ऑफलाईन अर्जापैकी १६० हे पुणे जिल्ह्यातील, ५५ नाशिक, १५ अहमदनगर जिल्ह्यातील होते. या एकूण ९२० प्राप्त अर्जांपैकी ७५० अर्ज सकारात्मकपणे निकाली काढण्यात आले. तसेच आज
अनुकंपा तत्वावर पुणे ०१, नाशिक ०२ नियुक्तीचे आदेश देण्यात आले.
वैद्यकीय परिपूर्तीचे पुणे १२, नाशिक ०८, अहमदनगर ०४ आदेश वितरित करण्यात आले तर भविष्यनिर्वाह निधीचे २२८ ना – परतावा आदेश वितरित करण्यात आले.

मृत्यू – नि- सेवा उपदान (DCRG) च्या मंजुरीचे आदेश ५ सेवानिवृत्त होणाऱ्या व्यक्तींना वितरीत करण्यात आले. त्याचबरोबर पुणे १५२, नाशिक २५१, अहमदनगर ११८ कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे विवरणपत्र वितरीत करण्यात आले आहे.
आज भविष्य निर्वाह निधीचे पुणे ५, नाशिक २ व अहमदनगर २ कर्मचाऱ्यांना अंतिम आदेश वितरीत करण्यात आले.
विद्यापीठाचा अभ्यासक्रम दोहा कतार येथे सुरु करण्यासाठी राज्य शासनाची परवानगी प्रदान करण्यात आली.
तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे (YCMOU) उपकेंद्रासाठी बालेवाडी येथे १० कोटी रुपये खर्च करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कवी कुलगुरू कालीदास संस्कृत विश्वविद्यालयाचे उपकेंद्र पुणे, रत्नागिरी, नांदेड व औरंगाबाद येथे स्थापन करणार तसेच
प्रबोधनकार अभ्यासकेंद्र सुरु करण्यासाठी २५ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विद्यापीठातील दोन संविधानिक पदांचे प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर लवकरच मंजुरी देणार, आकृतिबंधातील १११ पदांना शासनाने मान्यता दिलेली असून विद्यापीठामार्फत रोस्टर मंजुरी प्राप्त करून घेतल्यानंतर पदभरती सुरु करणार
वेतन अनुदानापोटी १९८८-८९ ते २०१९-२० पर्यंत थकबाकी १४० कोटी रुपयांच्या मागणीसाठी कार्यवाही करून टप्प्या टप्याने निधी वितरित करण्यात येईल.
प्राध्यापक भरती लवकरच
राज्यात कोविडच्या पार्श्वभूमीवर भरती थांबविण्यासाठी 4 मे रोजी पत्र काढले होते. मात्र लवकरच ही भरती सुरू होईल. ज्या विषयाला महाविद्यालयात एकही प्राध्यापक नाही त्या विषयाच्या प्राध्यापकापासून भरतीस सुरूवात केली जाईल असेही उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...