पुणे दि. 22 : पुणे विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकार मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रीया आज दि. 22 नोव्हेंबर 2016 रोजी शिवाजीनगर येथील शासकीय गोडाऊनमध्ये शांततेत पार पडली. या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळविणारे अनिल शिवाजीराव भोसले यांना निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी विजयी घोषीत केले.
या निवडणुकीत एकूण झालेल्या 658 मतांपैकी 650 मते वैध तर 8 मते अवैध ठरली. या निवडणुकीत अनिल शिवाजीराव भोसले यांना 440 मते, अशोक येनपूरे यांना 133 मते, संजय चंदूकाका जगताप यांना 71 मते, यशराज पारखी व विलास विठोबा लांडे यांना प्रत्येकी 3 मते मिळाली.
शिवाजीनगर गोडाऊनमध्ये सकाळी 8 वाजता मतमोजणी प्रक्रीयेला सुरुवात झाली. 6 टेबलवर मतमोजणी प्रक्रीया पार पडली. यावेळी या मतदार संघाचे निवडणुक निरीक्षक शिवाजीराव दौंड, उपजिल्हा निवडणुक अधिकारी समीक्षा चंद्राकार, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी राजेंद्र मुठे उपस्थित होते.