गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली येरवडा मध्यवर्ती कारागृहाची पहाणी

Date:

पुणे, दि.१:-  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येरवडा मध्यवर्ती कारागृहास प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी केली.यावेळी  राज्याचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा सुनिल रामानंद, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई,  दौलतराव जाधव  तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य शरद खटावकर,  येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक यु. टी. पवार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.      अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा  रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व कारागृहातील अधिकारी व कर्मचारी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यक त्या सर्व उपाययोजना यशस्वीपणे राबविल्या, त्यामुळे कारागृहात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यात यश आले. याबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्व कारागृह अधिकारी-कर्मचारी यांचे अभिनंदन केले. यावेळी श्री. देशमुख यांनी बंदीजनांशी सवांद साधत त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.      आगामी काळात आधुनिक कारागृहे उभारण्याचा व बंदी क्षमता वाढविण्याचा मानस असल्याचेही  गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘पुण्याच्या क्रीडा विश्वाला नवा आयाम देणार’:केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

⁠खासदार क्रीडा महोत्सवाचा पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाने समारोप पुणे (प्रतिनिधी) :...

मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना बाहेर काढू:ठाकरे बंधूंच्या युतीवर फडणवीसांचा घणाघात

मुंबई -महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीनंतर राजकीय वातावरण...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘स्टार प्रचारकां’ची फौज मैदानात

महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेनेच्या वक्त्यांची यादी जाहीर मुंबई | दि. २५...