पुणे, दि. 14 : दिवंगत पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांना जयंतीदिनी आज जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन करण्यात आले. विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात झालेल्या या कार्यक्रमात उपायुक्त कविता द्विवेदी यांनी पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपजिल्हाधिकारी दत्तात्रेय कविटके, तहसीलदार शितलकुमार यादव, सोनाली घुगे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.