पुणे, – दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेऊन जिल्हा प्रशासनाच्यावतीने आदरांजली अर्पण करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेतली. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.