Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कोविड – 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी समन्वय अधिका-यांच्या नेमणूका -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

Date:

पुणे दि. 9 : – पुणे जिल्हयामध्ये कोरोना विषाणु कोव्हीड – 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी वेगवेगळया विषयांकरीता इन्सीडन्ट कमांडर तसेच सहाय्यक इन्सीडन्ट कमांडर च्या नेमणूका करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
यामध्ये रोजगार हमी शाखेचे उपजिल्हाधिकारी सुधीर जोशी यांच्याकडे पुणे जिल्हयातील ग्रामीण क्षेत्रात, ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत , नगरपरिषद क्षेत्रामध्ये कोरोना संसर्गाचे संशयित रुग्ण आढळत आहेत अशा रुग्णांची कोरोना विषाणु तपासणी अहवाल संबधित लॅब कडून 24 तासात प्राप्त होईल याबाबत नियोजन करणे तसेच सदर अहवालानुसार संबंधित कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना ज्या रुग्णालयात बेड उपलब्ध आहेत त्या रुग्णालयामध्ये पुढील उपचाराकरीता दाखल करण्याबाबत नियोजनाकरीता संबंधित नोडल अधिकारी, सर्व संबधित इन्सीडन्ट कमांडर उपविभागीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांचे समन्वयाने नियोजन करणे. जिल्हा नोडल अधिकारी यांच्या समन्वयाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी नियोजन करणे तसेच दैनंदिन अहवाल जिल्हा नियंत्रण कक्षास साद करण्याबाबतची जबाबदारी देण्यात आली आहे.
पुणे जिल्हयातील छावणी परिषदे करीता झोपडपट्टी पुनर्वसनचे अपर जिल्हाधिकारी सुरेश जाधव यांच्याकडे पुणे जिल्हयातील छावणी परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये संशयित कोरोना रुग्णांची तात्काळ कोविड तपासणी करणे. ज्या भागामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत अशा भागामध्ये कंटेनमेंट झोन तयार करणे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील व्यक्ती हायरिस्क आणि लो रिस्क किमान 10-12 व्यक्त्तींचा शोध घेणे, इ.बाबत छावणी परिषद क्षेत्रातील इन्सीडन्ट कमांडर तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समन्वयाने नियोजन करणे. जिल्हा नोडल अधिकारी यांच्या समन्वयाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी नियोजन करणे तसेच दैनंदिन अहवाल जिल्हा नियंत्रण कक्षास सादर करण्याबाबतची जबाबदारी देण्यात आली आहे.
पुणे जिल्हयातील ग्रामीण क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्र नियोजनाकरीता एमआयडीसी,पुणेचे प्रादेशिक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अविनाश हदगल यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे पुणे जिल्हयातील ग्रामीण क्षेत्रात, ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत , नगरपरिषद क्षेत्रामध्ये कोरोना संसर्गाचे संशयित रुग्ण आढळत आहेत त्या भागात इन्सीडन्ट कमांडर हे कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेच्या संदर्भांत नियंत्रण आराखडा ( कंटेनमेंट झोन) तयार करत असतात. असे कंटेन्मेंट झोन तयार करीत असताना शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे कंटेनमेंट झोन तयार केले आहेत काय याची तपासणी करणे. तसेच सदर झोनमध्ये काही फेरबदल करावयाचा असल्यास मा.जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने फेरबदल करणे. या झोनमध्ये कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या कमी करण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातात का याची तपासणी करणे, याबाबत सर्व संबधित इन्सीडन्ट कमांडर था उपविभागीय अधिकारी यांच्या समन्वयाने नियोजन करणे. जिल्हा नोडल अधिकारी यांच्या समन्वयाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी नियोजन करणे तसेच दैनंदिन अहवाल जिल्हा नियंत्रण कक्षास सादर करण्याबाबतची जबाबदारी दिली आहे.

पुणे जिल्हयातील ग्रामीण क्षेत्रातील कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नियोजनाकरीता विशेष भूमी संपादन क्रं.17च्या उपजिल्हाधिकारी श्रीमती आरती भोसले यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. पुणे जिल्हयातील ग्रामीण क्षेत्रात, ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत , नगरपरिषद क्षेत्रामध्ये अधिक प्रमाणात कोरोना विषाणू संसर्ग रुग्ण आढळून येत आहेत. अशा रुग्णांच्या नजिकच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क व लोरिस्क किमान दहा ते बारा व्यक्तींचा शोध घेणे व संबधित व्यक्तींची वैद्यकीय माहिती प्राप्त करुन घेणे. संबधित व्यक्तींना होम आयसोलेशन / होम कॉरंटाईन करण्याबाबत सर्व संबधित इन्सीडन्ट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी यांच्याशी समन्वय साधून नियोजन करणे.जिल्हा नोडल अधिकारी यांच्या समन्वयाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी नियोजन करणे.
पुणे जिल्हयातील शासकीय व खाजगी रुग्णालयातील खाटांच्या उपलब्धतेबाबत नियोजन करण्याकरीता पुनर्वसन शाखेचे उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे ( शासकीय रुग्णालय) व उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे ( खाजगी रुग्णालयांकरीता) यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे. पुणे जिल्हयातील ग्रामीण क्षेत्रात, ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत , नगरपरिषद क्षेत्रामध्ये अधिक प्रमाणात कोरोना विषाणू संसर्ग रुग्ण आढळून येत आहेत. त्याअनुषंगाने सदर कार्यक्षेत्रामध्ये शासकीय व खाजगी रुग्णालयामध्ये उपलब्ध असलेल्या खाटांची माहिती प्राप्त करुन घेणे, ज्या कार्यक्षेत्रामध्ये कोरोना विषाणु पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत अशा रुग्णांना ज्या रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध आहेत त्या रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्याबाबत कोविड टेस्टींग नोडल अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांच्या समन्वयाने नियोजन करणे. जिल्हा नोडल अधिकारी यांच्या समन्वयाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी नियोजन करणे तसेच दैनंदिन अहवाल जिल्हा नियंत्रण कक्षास सादर करणे.
पुणे जिल्हयातील हवेली तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रामध्ये नियोजनाकरीता एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संजीव देशमुख यांच्याकडे हवेली तालुक्यातील ग्रामीण इन्सीडन्ट कमांडर हे कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेच्या संदर्भात नियंत्रण आराखडा कंटेन्मेंट झोन तयार करत असताना शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे कंटेनमेंट झोन तयार केले आहेत काय याची तपासणी करणे. या झोनमध्ये काही फेरबदल करावयाचा असल्यास मा.जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने फेरबदल करणे. या झोनमध्ये कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या कमी करण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातात का याची तपासणी करणे, याबाबत सर्व संबधित इन्सीडन्ट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी यांच्या समन्वयाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी नियोजन करणे तसेच दैनंदिन अहवाल जिल्हा नियंत्रण कक्षास सादर करण्याबाबतची जबाबदारी देण्यात आली आहे.
पुणे जिल्हयातील ग्रामीण क्षेत्राकरीता सहायक इन्सीडन्ट कमांडर म्हणून हवेलीचे तहसिलदार सुनिल कोळी (मो.नं.8286333999 ), सहायक अधिकारी म्हणून सहा.गटविकास अधिकारी, दौंड दिनेश अडसूळ (मो.नं. 9421762569) यांच्याकडे उरुळी कांचन, थेऊर, हडपसर मंडल हे क्षेत्र दिले आहे.तर संजय गांधी योजना (हवेली) तहसिलदार श्रीमती सुवर्णा बारटक्के ( मो.नं.9372416278) सहायक अधिकारी मुळशीचे सहा.गट विकास अधिकारी आप्पसाहेब गुजर ( मो.नं.9422567041) यांच्याकडे कोथरुड मंडल, खडकवासला मंडल, खेडशिवापूर मंडल हे क्षेत्र तसेच संजय गांधी योजनेच्या तहसिलदार श्रीमती रोहिणी आखाडे- फडतरे ( मो.नं.9226373191) सहाय्यक अधिकारी म्हणून हवेलीचे गट विकास अधिकारी श्री.जाधव ( मो.नं.9422078501 यांच्याकडे कळस मंडल, वाघोली मंडल या कार्यक्षेत्राची जबाबदारी देण्यात आली आहे.

पुणे जिल्हयात परराज्यातून / जिल्हयातून नागरीक रेल्वेने प्रवास करुन पुणे रेल्वे स्थानकावर दाखल होत आहेत. या प्रवाशांची कोरोना विषाणुच्या अनुषंगाने वैद्यकीय तपासणी करुन नोंद घेण्याकरीता कामगार उपआयुक्त विकास पनवेलकर ( मो.नं.9822348676) यांची समन्वय अधिकारी तर त्यांचे सहायक अधिकारी व कर्मचारी म्हणून सहा.कामगार आयुक्त ए.एस.खरात (मो.नं. 9870169288 ), सहा.कामगार आयुक्त् ए.पी.गिते (मो.नं. 9822297049 ), सहा.कामगार आयुक्त एन.ए.वाळके (मो.नं.9975933416), शासकीय कामगार अधिकारी जी.बी.बोरसे (मो.नं. 8698363299 ),शासकीय कामगार अधिकारी एस.एच.चोबे (मो.नं. 8793696580 ) तसेच शासकीय कामगार अधिकारी श्री.डी.पवार (मो.नं.7775963065 ) यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

पुणे जिल्हयात परराज्यातून / जिल्हयातून नागरीक रेल्वेने प्रवास करुन पुणे रेल्वे स्थानकावर दाखल होत आहेत. या प्रवाशांची कोरोना विषाणूच्या अनुषंगाने वैद्यकीय तपासणी करुन घेणेकामी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी समन्वय साधुन वैद्यकीय पथके उपलब्ध करुन घेणे तसेच पुणे महानगरपालिका यांच्याकडील समन्वय अधिकारी,परिमंडल क्र.1 चे उपआयुक्त विजय दहीभाते ( मो.नं.9689931591) यांच्याशी समन्वय साधुन आरोग्य विषयक बाबींबाबत कार्यवाही करणे. उपआयुक्त कामगार यांनी मा.सर्वोच्च् न्यायालयाच्या निर्देशानुसार पुणे जिल्हयात रेल्वे, बस व वैयक्तिक वाहनांनी येणा-या कामगारांचा तालुकानिहाय डाटाबेस तयार करणे तसेच केलेल्या कार्यवाहीचा दैनंदिन अहवाल नमुना 1,2,3 मध्ये जिल्हा नियंत्रण कक्षास तसेच मा.विभागीय आयुक्त ( मागासवर्ग कक्ष) पुणे यांना सादर करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
पुणे शहर सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक एन.व्ही.आगाव (मो.नं.7588573025) यांची समन्वय अधिकारी तर त्यांचे सहायक समन्वय अधिकारी म्हणून सहा.निबंधक श्रीमती एस.बी.कडू (मो.नं. 9822991303), सहा.निबंधक,एस.एन जाधव, सहा.निबंधक सह.संस्था एन.ए.अनपट (मो.नं.9011590100), सह.अधिकारी श्रेणी 2 श्रीमती एम.आर.मंडलिक (मो.नं.9860409282),सहकारी संस्था,पुणे शहरचेअधिक्षक बी.एल.साबळे (मो.नं.9422540417), सहकारी संस्था,पुणे शहरचे वरिष्ठ लिपिक एस.एस.तळपे (मो.नं. 9527113568) यांच्याकडे परराज्यातून / जिल्हयातून रेल्वेने प्रवास करुन पुणे रेल्वे स्थानकावर दाखल होणा-या प्रवाशांची कोरोना विषाणुच्या अनुषंगाने वैद्यकीय तपासणी करुन घेण्याकामी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी समन्वय साधून वैद्यकीय पथके उपलब्ध करुन घेणे तसेच पुणे महानगरपालिका यांच्याकडील समन्वय अधिकारी परिमंडल क्र.1 चे उपआयुक्त विजय दहीभाते ( मो.नं.9689931591) यांच्याशी समन्वय साधुन आरोग्य विषयक बाबींबाबत कार्यवाही करणे. उपआयुक्त कामगार यांनी मा.सर्वोच्च् न्यायालयाच्या निर्देशानुसार पुणे जिल्हयात रेल्वे, बस व वैयक्तिक वाहनांनी येणा-या कामगारांचा तालुकानिहाय डाटाबेस तयार करणे तसेच केलेल्या कार्यवाहीचा दैनंदिन अहवाल नमुना 1,2,3 मध्ये जिल्हा नियंत्रण कक्षास तसेच मा.विभागीय आयुक्त (मागासवर्ग कक्ष) पुणे यांना सादर करण्याची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. नवल किशोर राम यांनी दिली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हडफडे नाईटक्लब आग प्रकरण: अधिकारी निलंबित, चौकशीला गती; मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश

गोवा पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना, सर्व पर्यटन आस्थापनांचे सुरक्षा...

कंत्राटदारांच्या प्रश्नावर संसदेच्या अधिवेशनानंतर पुण्यात बैठक

शरद पवार यांचे सुनील माने यांना आश्वासननवी दिल्ली :...

पुण्यातील उत्तर प्रदेशीय भामट्या रिक्षाचालकाला दिल्लीत जाऊन पकडला..

बाणेरमध्ये एकाला रिक्षाने उडवलं, उपचाराच्या बहाण्याने नेलं ,पण ...