तळजाई वनउद्यानात निसर्ग पर्यटन विकास आराखड्यासाठी 13 कोटी-उपमुख्‍यमंत्री अजित पवार

Date:

पुणे,: पाचगाव पर्वती येथील तळजाई वनउद्यानात निसर्ग पर्यटन विकास आराखड्यासाठी 13 कोटी रुपये उपलब्‍ध करुन दिले जातील, अशी माहिती उपमुख्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयात तळजाई वन उद्यान विकास आराखड्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चा करण्यात आली. यावेळी त्‍यांनी ही माहिती दिली.

यावेळी सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार माधुरी मिसाळ, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्‍त आयुक्‍त रुबल अगरवाल, उपवन संरक्षक श्रीलक्ष्‍मी, नगरसेवक सर्वश्री आबा बागूल, आश्विनी कदम, सुभाष जगताप, माजी नगरसेवक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 पुणे जिल्‍ह्याच्‍या विकास कामांसाठी कोणतीही आडकाठी आणली जाणार नाही, असे स्‍पष्‍ट करुन उपमुख्‍यमंत्री पवार म्‍हणाले,  पुणे शहराच्‍या दृष्टिने चांगल्‍या गोष्‍टी व्‍हाव्‍यात, या मताचा मी आहे. पाचगाव पर्वती या वनक्षेत्राचा निसर्ग पर्यटन आराखडा तयार करुन त्‍यास नागपूर येथील महाराष्‍ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाची मंजुरी घेण्‍यात आलेली आहे. या आराखड्यासाठी राज्‍य शासनाच्‍यावतीने 13 कोटी रुपये उपलबध करुन दिले जातील.

यानंतर बैठकीत सेनापती बापट रोड ते पंचवटी पर्यायी रस्‍ता, मॉडर्न कॉलेज येथील पर्यायी रस्‍त्‍याबाबतही चर्चा झाली. यावेळी आमदार सिध्‍दार्थ शिरोळे, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम,  पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पुणे प्रदेश विकास प्राधीकरणाचे महानगर आयुक्‍त विक्रमकुमार,  अतिरिक्‍त आयुक्‍त रुबल अगरवाल, उपवन संरक्षक श्रीलक्ष्‍मी, निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदी उपस्थित होते. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...