पुणे विभागातील 8 हजार 198 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 13 हजार 28 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे दि. 10 :- पुणे विभागातील 8 हजार 198 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 13 हजार 28 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4 हजार 221 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 609 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 277 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.93 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 10 हजार 81 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 6 हजार 380 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 259 आहे. कोरोनाबाधित एकूण 442 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 250 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 63.29 टक्के आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 366 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 230, सातारा जिल्ह्यात 20, सोलापूर जिल्ह्यात 107, सांगली जिल्ह्यात 04 तर कोल्हापूर जिल्ह्यात 5 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील 669 कोरोना बाधीत रुग्ण असून 401 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 240 आहे. कोरोनाबाधित एकूण 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 1 हजार 410 कोरोना बाधीत रुग्ण असून 792 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 493 आहे. कोरोना बाधित एकूण 125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील 176 कोरोना बाधीत रुग्ण असून 97 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 73 आहे. कोरोना बाधित एकूण 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 692 कोरोना बाधीत रुग्ण असून 528 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 156 आहे. कोरोना बाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 5 हजार 552 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 1 हजार 575 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 977 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 88 हजार 345 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 13 हजार 28 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.(टिप : – दि. 10 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा.पर्यंतच्या आकडेवारीनुसार)