पुणे : समाज कल्याण विभागामार्फत पुणे जिल्हृयातील मान्यवर वृध्द साहित्यिक व वृध्द कलाकार मानधन योजना राबवली जाते. सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने 7 फेब्रुवारी, 2014 रोजीच्यासुधारीत शासन निर्णयाद्वारे काही बदल केलेले आहेत. तरी ज्या कलांवंतांनी सदर योजनेंतर्गत यापुर्वी अर्ज केले होते, परंतु अद्याप त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा कलावंतांनी नवीन विहीत नमुन्यात आपले प्रस्ताव तालुकास्तरावर संबंधित पंचायत समितीमध्ये लवकरात लवकर सादर करावेत. अधिक माहितीसाठी समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद पुणे किंवा गटविकास अधिकारी, पंचायत समिती येथे संपर्क साधावा. पात्र कलांवताचे अर्ज मान्यतेसाठी जिल्हास्तरीय निवड समितिी कडे सादर केले जातील असे जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकार अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.


